एक वाटी मैदा, एक वाटी कणीक, अर्धा चमचा मीठ, चार चमचे तेल, चिंचेची गोड चटणी, थोडीशी चिंच, थोडेसे गुळ, पाच ते सहा खजूर, एक चमचा जिरे, चवीनुसार तिखट व मीठ. बटाटयाच्या भाजीवरून घालण्यासाठी बारीक़ चिरलेला कांदा, थोड़े तिखट मीठ, एका लिंबाच्या फोड़ी, थोडा टोम्याटो सॉस, दोन अंडी व बटर.
कसे तयार कराल:
आधी कणीक, मैदा, मीठ व तेल एकत्र करून पोळीसाठी भिजवा व पिठाच्या पातळ पोळ्या लाटून तव्यावर शेकवा.नंतर कांदा बटाटयाची भाजी व चिंचेची पातळ चटणी करून ठेवावी.आता अंडे फेटून थोड़े मीठ घालावे.
नंतर तव्यावर बटर घालावे. फेटलेले अंडे चमच्याने थोडेसे पोळीला लावावे नंतर अंड्याची बाजू तव्यावर येईल अशाप्रकारे पोळी तव्यावर टाकावी.पोळी तव्यावर टाकल्याबरोबर अंडे सेट होईल, पोळीच्या दुसऱ्या बाजूला अंड्याचे थोडेसे मिश्रण लावून पोळी उलटावी.कडेने थोडेसे तूप सोडावे मध्यभागी एक चमचा चिंचेची चटणी गोल पसरावी.पोळीवर एका कडेला थोड़ी भाजी घालावी, कच्चा कांदा घालावा व चिमूटभर तिखट-मीठ घालावे, लिंबाचा थोडा रस घालावा, गोल गुंडाळी करावी.आणि फ्रॅंकी तयार, फ्रॅंकी वरून थोडा सॉस लावून गरमच सर्व करा.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार