| ||||||||||
|
साहित्य
·
दीड वाटी मैदा
·
अर्धी वाटी कणीक
·
एक वाटी कढीपत्त्याची पाने
·
चवीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या व मीठ
·
एक टेबलस्पून चाट मसाला
·
तळण्यासाठी गरजेनुसार तेल
पाककृती
·
सर्वप्रथम कढीपत्याची पाने धुवून, पुसून कोरडी करून घेऊन मिक्सरमध्ये
घालावीत.
·
त्यातच हिरव्या मिरच्या व थोडे मीठ घालून जाडसर भरड वाटून घ्यावे.
·
नंतर एका परातीत मैदा, कणीक व वरील कढीपत्त्याचे मिश्रण आणि
चवीनुसार मीठ घालून पीठ घट्ट भिजवावे.
·
अर्ध्या तासानंतर पीठ एकसारखे करून त्याचे चार गोळे करावेत. नंतर
हे गोळे पाटावर पातळ लाटावेत.
·
एका कढईत तेल चांगले तापवून घ्यावे व लाटलेल्या पोळीचे कातण्याने
किंवा सूरीने पातळ पातळ काप करावेत.
·
तापलेल्या तेलात हे काप खमंग तळून घ्यावेत व वरून चाट मसाला
भुरभुरावा. गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे. चटकदार चटपटीत कुरकुरे
तयार.
साहित्य
·
५-६ उकडलेले
बटाटे
·
दोन वाट्या ताजा कोवळा मटार
·
एक वाटी किसलेले चीज
·
एक वाटी नारळाचे खोवलेले खोबरे
·
एक वाटी कोथिंबीर
·
एक टेबलस्पून आले-मिरची पेस्ट
·
दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
·
एक टेबलस्पून लिंबाचा रस
·
चवीनुसार मीठ आणि साखर
·
फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग व हळद.
पाककृती
·
गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी व जिरे टाकून
दोन्ही चांगले तडतडल्यावर त्यात मटार घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
·
मग त्यात खोवलेले ओले खोबरे, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट व लिंबाचा रस
घालून पुन्हा परतून घेणे
·
मटार जास्त कडक होऊ देऊ नका. त्यात किसलेले चीज घालून पुन्हा
थोडेसे परता. गॅस बंद करा.
·
उकडलेल्या बटाट्यात मीठ व कॉर्नफ्लोअर घालून मळून गोळा तयार करा.
·
त्यात मटार व चीजचे सारण भरा. पारीचे तोंड बंद करून त्याला गोल
चपटा आकार देऊन गरम तेलात तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.
साहित्य
·
१० चॉप्स बेस्ट
·
६ हिरवी वेलची
·
२ चमचे बडीशेप
·
५ लवंगा
·
२ मध्यम दालचिनीचे तुकडे
·
४ कप दूध
·
अर्धा वाटी बेसन
·
पाव वाटी मिरचीपूड
·
अर्धा चमचा हिंग
·
१ लिंबाचा रस
·
अर्धा कप तूप
पाककृती
·
प्रथम वेलची, लवंग, दालचिनी आणि बडीशेप एका कापडाच्या
तुकड्यात बांधून त्याची पुरचुंडी करा.
·
मोठ्या पसरट पातेल्यात चॉप्स घालून त्यात दूध, अर्धा लिटर पाणी आणि ही मसाल्याची
पुरचुंडी घालून ४० मिनीटे मध्यम गॅसवर चॉप्स शिजेपर्यंत व पाणी आटेपर्यंत ठेवा.
·
चॉप्स शिजत असतानाच बेसन व तांदळाचे पीठ, थोडे पाणी घालून भाज्याच्या पिठासारखे
भिजवा.
·
पिठामध्ये मीठ, लाल
मिरचीपूड, हिंग
घालून फेटा.
·
शिजलेले मटण चॉप्स खाली उतरवून जरा थंडा करा.
·
कढईत तूप तापवून त्यात चॉप्स पिठात घालून हलकेच सोडा व सोनेरी
रंगावर तळून घ्या.
·
गरमागरम काश्मिरी मटण चॉप्स चटणी वा सॉससोबत सर्व्ह करा.
याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)