२/२२/२०१५

ट्विटरवर दररोज होतात 5 लाख न्यूड फोटो ट्विटसोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रत्येक मिनिटाला कोट्यवधी युजर्स अॅक्टिव्ह असतात. सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये फेसबुक सर्वात लोकप्रिय आहे, तर ट्विटर ट्रेण्ड्ससाठी नेहमीच चर्चेत असतो. मात्र या दोन्ही सोशल नेटवर्किंग साईट्समधून एक महत्वाची बाब समोर आली आहे. ती म्हणजे ट्विटरवर रोज जवळपास 5 लाख न्यूड फोटो पोस्ट केली जातात. इतर कोणत्याही सोशल नेटवर्क साईटवर एवढ्या मोठ्याप्रमाणावर न्यूड फोटो पोस्ट केले जात नाहीत.

ट्विटरवर सर्वात जास्त न्यूड फोटो पोस्ट करण्यामागे एक कारण म्हणजे फेसबुक किंवा यू-ट्यूबसारखं ट्विटरवर कोणत्याही पोस्टला ब्लॉक करण्याची सुविधा नाही. ट्विटरकडे पोस्ट ब्लॉक करण्याची कोणतीही सुविधा नसल्याने घरातील लहान मुलेही असे न्यूड फोटो पाहू शकतात, त्यामुळे अनेकांनी याविरोधात ट्विटरकडे आक्षेपही नोंदवला होता.

ब्रिटिश वेबसाईट ‘डेली मेल’च्या माहितीनुसार, ट्विटरने न्यूड फोटो असलेल्या पोस्टवर अॅक्शन घेण्यास नकार दिला आहे. फेसबुक आणि गुगलसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या अधिकाऱ्यांनी इंटरनेटवरील पॉर्न पोस्टविरोधात अॅक्शन घेण्यासाठी बैठकही बोलावली होती. मात्र ट्विटरचे अधिकारी या बैठकीला गैरहजर राहिले.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search