२/२६/२०१५

कोकण रेल्वेवर 3 वर्षांत 50 हजार नोकऱ्या : रेल्वेमंत्रीरेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणातील जनतेला दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोकण रेल्वेवर तीन वर्षांत 50 हजार रोजगार संधी उपलब्ध होणार आहे, असं रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
सुरुवातीच्या गदारोळानंतर सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत रेल्वे बजेट सादर केलं.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. शिवाय रेल्वेमंत्रालयाला कोकण रेल्वेमधून मिळणारं उत्पन्नही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी कोकण रेल्वेसाठी पर्यायी कोकणातील लोकांसाठी केलेली घोषणा महत्त्वाची आहे.
शिवाय स्वत: रेल्वेमंत्री कोकणातील असल्याने तिथल्या जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कोकणसाठी अधिक गाड्यांची घोषणा केली नसली तर रोजगाराची घोषणा करुन सुरेश प्रभू यांनी कोकणवासियांना खुशखबर दिली आहे.
दरम्यान, रेल्वे भरतीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा करणार येणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं.

संदर्भ: facebook share,loksabha channel,
लेखक :ABP majha news

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search