अमेरिकास्थित कंपनी ‘ब्लू प्रॉडक्ट’ने ‘ब्लू स्टुडिओ एनर्जी’ स्मार्टफोन’ लॉन्च केला आहे. ‘ब्लू स्टुडिओ एनर्जी’चं वैशिट्य म्हणजे या फोनची सुपर बॅटरी. हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सलग 96 तास म्हणजे जवळपास 4 दिवस या फोनची बॅटरी राहते. शिवाय स्टँडबायवर ठेवल्यास सलग 45 दिवस बॅटरी कायम राहते.
‘ब्लू स्टुडिओ एनर्जी’ची वैशिष्ट्य :

एकदा चार्जिंग केल्यावर सलग चार दिवस वापरता येईल इतकी सुपर बॅटरी आहेच. मात्र त्याचबरोबर आणखीही अनेक वैशिष्ट्य या फोनचे आहेत. 5.0 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले या फोनला असणार आहे. 8 मेगापिक्सेल कॅमेरा, तर 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. शिवाय 1.3 गीगाहर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर आहे.

अनलॉक्ड ड्युअल सीम कार्ड वापरता येणार आहे. त्याचबरोबर 4.4 किटकॅट ही अपग्रेडेबल  ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 8 जीबी इंटर्नल मेमरी स्टोरेज जी 64 जीबी पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. रॅम मात्र 1 जीबीचा असणार आहे. ब्लूटूथ, वायफाय अशा कनेक्टिव्हिटींसाठीही सुविधा आहे.

विशेष म्हणजे ‘ब्लू प्रॉडक्ट’ने कॅमेऱ्यामध्ये आकर्षक फीचर्स, कॅमेरा अॅप समाविष्ट केले आहेत. उदाहरणार्थ- इरॅझर, फेस डिटेक्शन, फेस अनलॉक, स्मार्ट गेस्चर, गेम झोन इत्यादी.

या फोनची 10.4 मीमी. इतकी जाडी आहे. तर 180.29 ग्रॅम एवढं वजन आहे. ‘ब्लू प्रॉडक्ट’चा हा नवा आणि आकर्षक मोबाईल फोनची किंमत आहे 149 डॉलर्स म्हणजेच 9300 रुपये.

सुपर बॅटरी असलेल्या या फोनला मोबाईलप्रेमींकडून भरभरुन प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Blogger द्वारा समर्थित.