फेसबुक आपल्या युजर्ससाठी नेहमीच काहीतरी नंव फीचर घेऊन येत असतं. फेसबुकने अँड्रॉईड आणि आयफोनवरील अॅप अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. या अपडेटमध्ये एका नव्या फीचरचा समावेश केला आहे. ज्यामध्ये युजर्स जेव्हा एखादा फोटो फेसबुकवर अपलोड करतील तेव्हा त्या फोटोवर स्टिकर्सही चिकटवता येणार आहेत.

फेसबुकवर अपलोड केलेल्या फोटोवर जेव्हा तुम्ही स्टिकर चिकटवाल, त्यानंतर तु्म्ही त्या स्टिकरला रोटेटही करु शकता किंवा फोटोवर दुसऱ्या जागी प्लेसही करु शकता. शिवाय एकाच फोटोवर अनेक स्टिकर्स लावणेही शक्य आहे. फोटोवरील न आवडलेला स्टिकर डिलिट करण्याचीही सुविधा असणार आहे.

फेसबुक स्टिकर्सना मोठ्या प्रमाणात प्रमोट करत आहे. फेसबुकने डिसेंबरमध्ये नवं ‘स्टिकर्स फॉर मेसेंजर’ हा अँड्रॉईड आणि आयफोनसाठी अॅप लॉन्च केला. हा अॅप तुम्हाला वापरायचा असल्यास फेसबुक मेसेंजरही इन्सटॉल करणे आवश्यक आहे.

स्टिकर्स मेसेंजर अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोटोवर स्टिकर्स चिकटवू शकणार आहात. या अॅपमध्ये इमोटिकॉन्सचे 52 प्रकार असणार आहेत. शिवाय स्टिकर्स मेसेंजर अॅपमध्ये ‘डिसलाईक’चा स्टिकरही असणार आहे.

फेसबुक युजर्स आपल्या फोटोवर कॅप्शन्ससुद्धा अॅड करु शकतात. शिवाय अॅमधील इनबिल्ट कॅमेऱ्याच्या सहाय्याने फोटो काढण्याआधीही स्टिकर्स लावणं शक्य होणार आहे.

दरम्यान, फेसबुकने नव्याने आणलेले हे अॅप अजून भारतातील युजर्सना उपलब्ध केले गेले नाही.
Blogger द्वारा समर्थित.