२/१६/२०१५

आता अँड्राईड वनवर अॅप्स वापरा मोफत, गुगलकडून ‘झिरो रेटिंग’ सुविधाअँड्रॉईड वन प्रोग्राम असलेला मोबाईल वापरणाऱ्यांसाठी गुगलकडून आनंदाची बातमी आहे. कारण गुगलने झिरो रेटिंग अॅप्स ही सुविधा लॉन्च केली आहे. ज्यामुळे अँन्ड्राईड वनवरील काही अॅप्स मोफत वापरता येणार आहेत.

गुगलने भारतात गेल्याच महिन्यात अॅप तयार करणाऱ्या कंपन्यांशी ‘झिरो रेटिंग’बाबत चर्चा. मोबाईल डेटावरील खर्च कमी करण्यासाठी गुगलच्या या नव्या फीचरचा खूप फायदा आहे.

गुगल प्लेस्टोअरमध्ये मोफत अॅप्स उपलब्ध करुन देण्यासाठी गुगलने काही कंपन्यांशी चर्चा केली आहे. मोबाईल अॅप्स वापरताना इंटरनेटची गरजच भासू नये, या दृष्टीने गुगलचे प्रयत्न सुरु आहेत.

गुगलच्या या संकल्पनेला ‘झिरो रेटिंग’ असे म्हटले आहे. ‘झिरो रेटिंग’ अॅप्सद्वारे गुगल प्ले स्टोअरमधील काही अॅप्स वापरताना त्याचा इंटरनेट डेटावर काहीही परिणाम होणार नाही. म्हणजेच हे अॅप्स मोफत वापरता येणार आहेत.

मध्यमवर्गीय लोकांना किंवा ज्यांना इंटरनेट डेटा परवडत नाही, अशा मोबाईल ग्राहकांसाठी गुगलने ही सुविधा सुरु केली आहे. मोबाईल वापरणाऱ्यांना जास्तीत जास्त अॅप्स वापता यावे, हा उद्देश यामागे असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

भारतातील फ्लिपकार्ट, स्नॅपडील, रेडबस इत्यादी कंपन्यांच्या अॅप्सचाही गुगल प्लेस्टोअरमध्ये समावेश केला जाणार आहे. हे अॅप्स वापरताना कोणताही डेटा चार्ज केला जाणार नाही.

दरम्यान, गुगल भारतानंतर इंडोनिशियामध्येही ही सुविधा उपलब्ध करुण देणार आहे.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search