२/०८/२०१५

ऑर्कुटनंतर जीटॉकचंही लॉगआऊट, पुढच्या आठवड्यात जीटॉक निरोप घेणारईमेल अकाऊंटसोबतच चॅटिंग आणि शेअरिंगसाठी गुगलने सुरू केलेली 'जी-टॉक' सेवा १६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे आता चॅटिंग, शेअरींगसाठी अॅडव्हान्स असे गुगल हँगआऊट अॅप्लिकेशन वापरा, असेही कंपनीकडून कळवण्यात आले आहे.

जी-टॉक ही चॅटिंग आणि शेअरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पहिल्या काही इंटरनेट अॅपपैकी एक होतं. मात्र व्हॉट्सअॅप, हाइकने चॅटिंग आणि माहिती शेअर करण्यात जी-टॉकला मागे टाकलं. त्यामुळे या अॅप्सना तगडी टक्कर देण्यासाठी हँगआऊट हे अप्लिकेशन गुगलने बाजारात आणलं.

हँगआऊटमधून व्हिडिओ कॉलिंग आणि जगभरात कुठेही फोन कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच हँगआऊट वापरताना डेस्कटॉपवर सुरू असलेल्या कामात अडथळाही निर्माण होत नाही. त्यामुळे स्पर्धेत मागे पडत चाललेली जी-टॉक सेवा बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, हँगआऊट हे अॅप्लिकेशन गुगल क्रोमला सपोर्ट करत असल्याने क्रोम न वापरणाऱ्या यूजर्सची पंचाईत होण्याची शक्यता आहे

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search