मुंबईत घरं घेणाऱ्यांसाठी म्हाडाने खुशखबर दिली आहे. येत्या मे महिन्यात म्हाडाने तब्बल 4 हजार 468 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई म्हाडाच्या 785 आणि कोकण बोर्डाच्या 3 हजार 683 घरांचा समावेश आहे.

म्हाडाच्या मुंबई आणि उपनगरातील 785 घरांसाठी म्हाडाने ही लॉटरी जाहीर केली आहे. यामध्ये

गोरेगाव – 182 घरं - अत्यल्प उत्पन्न गट

मानखुर्द - 66 घरं – अत्यल्प उत्पन्न गट  

मालाड- मालवणी – 232 घरं – अल्प उत्पन्न गट

मुलुंड – 249- घरं – मध्यम उत्पन्न गट

शीव (सायन)-  56 घरं – मध्यम उत्पन्न गट

या ठिकाणी ही घरं उपलब्ध आहेत. मात्र उच्च उत्पन्न गटासाठी म्हाडाने मुंबईत लॉटरी जाहीर केलेली नाही.

दुसरीकडे कोकण बोर्डानेही 3 हजार 683 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. या सर्व घरांची लॉटरी एकत्रच निघाणार आहे.

त्यामुळे मुंबईकरांना घरांसाठी लॉटरीद्वारे आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
Blogger द्वारा समर्थित.