मोटोरोला भारतात नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यंदा मोटोरोला आपला हाय-बजेट स्मार्टफोन मोटो मॅक्सला भारतात फ्लिपकार्ट सोबत भागीदारीमध्ये लाँच करणार आहे. ऑनलाइन रिटेलरने काल मोटोरोला मोटो मॅक्सबाबत ट्विट केले. ‘लवकरच मोटो बीस्ट भारतात लाँच होणार आहे. यासंबंधी आम्ही तुम्हांला यापुढेही माहिती देत राहू.’   

या ट्विटसोबत जो फोटो पोस्ट करण्यात आला आहे त्यांची टॅगलाइन पाहता हा फोन मोबाइल बाजारात चांगलाच धुमाकूळ घालणार असे दिसून येते. मात्र, अद्याप तरी फोन कधी लाँच होणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. नोव्हेंबरमध्ये मोटोरोलाने याला ग्लोबली लाँच केलं होतं आणि त्याचं नाव ड्रॉयड टर्बो असं होतं. मात्र, कंपनी भारतामध्ये याला मोटो मॅक्स नावाने लाँच करणार आहे. 64 जीबी क्षमता असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत जवळजवळ रु. 48,000 असू शकते.    

मोटो मॅक्सच्या या स्मार्टफोनचे विविध फिचर्स ग्राहकांना आकर्षित करतील असा कंपनीला विश्वास आहे. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 3900mAh आहे. या बॅटरीची खासियत म्हणजे, 15 मिनिटे बॅटरी चार्जिंग केल्यानंतर 8 तास बॅटरी बॅकअप मिळतो. 
मोटो मॅक्समध्ये 5.2 इंच डिस्प्ले आणि QHD 1440x2560 पिक्सल रेझ्युलेशन आहे. याचा प्रोसेसर देखील अतिशय उत्तम आहे. 2.77GHz805 स्नॅपड्रॅगनसोबत पिक्सल डेन्सिटी 565ppi आहे. यामध्ये 3 जीबी रॅम आहे. यामध्ये ऑटोफोकस आणि f/2.0 अॅपेचर सह 21 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, तसेच 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटीमध्ये 4G LTE, वाय-फाय, मायक्रो यूएसबी आणि ब्ल्यूटूथ यासारखे वेगवेगळे पर्याय यात आहेत. या फोनमध्ये ओएस 4.4 किटकॅट आहे. जो की, 5.0 अँड्रॉईडमध्येही अपग्रेड होऊ शकतो.
Blogger द्वारा समर्थित.