२/२६/२०१५

व्हॉट्सअप वेब आता मोझिला फायरफॉक्स आणि ऑपेरावरही उपलब्ध!सुरवातीच्या काळात फक्त स्मार्टफोनपुरती मर्यादित असलेल्या व्हॉट्सअप या मेसेजिंग आणि चॅट सेवेनं आता आपला पसारा वाढवलाय. व्हॉट्सअप हे मोबाईल अॅप आता ऑपेरा आणि मोझिला फायरफॉक्सवरही उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅपचं वेब व्हर्जन सुरू झालं तेव्हा ते फक्त गूगलच्या क्रोमपुरतंच मर्यादित होतं. पण आता त्यामध्ये ऑपेरा आणि फायरफॉक्सची भर पडलीय. व्हॉट्सअॅपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती जारी करण्यात आलीय.
इंस्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅप जगभरात प्रसिद्ध आहे. व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या 70 कोटींच्या पुढे गेलीय. व्हॉट्सअॅप युझर्स बऱ्याच काळापासून ही सेवा डेस्कटॉपवर उपलब्ध करून देण्याची मागणी करत होते.
ब्लूस्टॅक्ससारख्या काही अॅपच्या माध्यमातून डेस्कटॉपवर यापूर्वीही व्हॉट्सअॅप उपलब्ध होत असलं तरी त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. म्हणून व्हॉट्सअॅपने महिन्याभरापूर्वी फक्त गूगलच्या क्रोम ब्राऊसरवरच व्हॉट्सअॅप वेब ही सेवा उपलब्ध करून दिली. व्हॉट्सअप वेब ही सेवा सुरूवातीच्या काळात फक्त क्रोमवरच उपलब्ध असल्यामुळे डेस्कटॉपवर मोझिला किंवा अन्य ब्राऊसर वापरणाऱ्यांना फक्त व्हॉट्सअप वेबसाठी क्रोम ब्राऊसर सुरू करावं लागायचं. आता त्यांना दोन-दोन ब्राऊसर उघडून ठेवण्याची गरज भासणार नाही. कारण ऑपेरा आणि मोझिला फायरफॉक्सवर व्हॉट्सअॅपची मजा घेता येणार आहे.
व्हॉट्सअॅप ही इन्स्टंट मेसेसिंग सेवा फेसबुकच्या मालकीची आहे. अजूनही नेटिझन्स मोठ्या संख्येनं वापरत असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोअरर आणि अॅपलच्या सफारी या वेब ब्राऊसरवर व्हॉट्सअॅप वेब उपलब्ध झालेलं नाही. त्याबाबत व्हॉट्सअपकडून अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.source-https://twitter.com/WhatsApp

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search