लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध

कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....

कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....

कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया ...
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...

२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...

३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात ग्यास पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...

४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...

५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...

७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ....

८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...

९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो ...

१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...

११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ...

१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...

१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....

१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....

कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही .....

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita