२/१०/२०१५

कोकणातल्या गावोगावी च्या जत्रा
कालच आंगणेवाडिची जत्रा पार पडली .भराडी मातेच्या दर्शनाला दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांप्रमाणेच मुंबई परिसरातील कोकणी बांधवांचा, राजकीय मंडळींचाही तेथे महापूर लोटला होता. सुमारे १५ लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे यंदा दर्शन घेतले असल्याचे म्हटले गेले.
देवदिवाळी झाली आणि तुळशीचे लग्न लागले की, कोकणातील ठिकठिकाणच्या देव-देवतांच्या पारंपरिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या जत्रोत्सवात कोकणी माणूस मोठय़ा भक्तिभावाने आणि तन्मयतेने रमून जातो. प्रत्येक गावातील देवालयाच्या परिसरात अशा जत्रा भरत असल्या तरी कोकणातील काही जत्रा या नावाजलेल्या आणि मोठा व्याप असणार्‍या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा मार्लेश्‍वराच्या यात्रेचा मकरसंक्रांती दिवशी प्रारंभ होतो. संगमेश्‍वर तालुक्यातील देवरुखपासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या या देवस्थानाला आता पर्यटनस्थळाचाही दर्जा प्राप्त झाला आहे. मार्लेश्‍वराच्या मंदिरातील नागराजांची उपस्थिती, हे सुद्धा एक आश्‍चर्य मानले जाते. या सर्व बाबी भाविकांना मार्लेश्‍वराची ओढ वाढवण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडीच्या जत्रेप्रमाणेच सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्लीची 'लोटांगण जत्रा'सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे. सोनुर्लीच्या श्री माऊलीच्या जत्रेनंतरच कोकणातील मोठय़ा जत्रांचा प्रारंभ होत असतो.
कणकवली नांदगाव ची देव कोळंबाचा पण उत्सव साजरा होतो .पाहूणे मंडळी कोंबडी बकर्याचा बळी दिला जातो .प्रसादासाठी मटण व भाकरी दिली जाते खूप गर्दी असते .गावोगावी चे लोक येतात .गावचे पाटिल मंडळी मॅनेज करतात .रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा मार्लेश्‍वराच्या यात्रेचा मकरसंक्रांती दिवशी प्रारंभ होतो. संगमेश्‍वर तालुक्यातील देवरुखपासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या या देवस्थानाला आता पर्यटनस्थळाचाही दर्जा प्राप्त झाला आहे. मार्लेश्‍वराच्या मंदिरातील नागराजांची उपस्थिती, हे सुद्धा एक आश्‍चर्य मानले जाते. या सर्व बाबी भाविकांना मार्लेश्‍वराची ओढ वाढवण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडीच्या जत्रेप्रमाणेच सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्लीची 'लोटांगण जत्रा'सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे. सोनुर्लीच्या श्री माऊलीच्या जत्रेनंतरच कोकणातील मोठय़ा जत्रांचा प्रारंभ होत असतो.
या जत्रा मुख्यत: मंदिराच्या परिसरात होत असल्या तरी त्यांचे स्वरूप धार्मिकतेपेक्षा अधिक सांस्कृतिक प्रकारचे असते. तेथे पूजा-अर्चा, लोटांगणे, गार्‍हाणी, देवांच्या भेटीगाठी हे धार्मिक कार्यक्रम होत असतातच; पण तेथील करमणुकीची अनेक साधने, दशावतारी नाटक, मेळे यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम हे या जत्रांचे मोठे आकर्षण असते. पूर्वी वाहतुकीची आणि करमणुकीची साधने अपुरी असल्यामुळे ठिकठिकाणच्या जत्रांना फार महत्त्व होते. आता तर ग्रामीण भागातही घरोघरी टीव्हीचे संच आणि केबल्सचे जाळे निर्माण झाले आहे. मनोरंजनाबरोबर इतर गरजेची साधनेही विपुल झाली आहेत. तसेच पूर्वी केवळ जत्रेमध्ये विकत मिळणार्‍या मिठाई, खेळणी आदी गोष्टीही आता गावोगावी दुकानातून उपलब्ध होऊ लागल्या आहेत. तरीही त्यामुळे जत्रांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट आंगणेवाडीसारख्या जत्रांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
जत्रा या अनेकांच्या दृष्टीने रोजगाराचेही एक साधन आहे. शेतीची कामे संपली की अनेक गावकरी विविध ठिकाणच्या जत्रांमध्ये खाद्यपदार्थ किंवा खेळण्यांची दूकाने असतात .चायना खेळणीच मिळवतात .
हल्ली यातील काही ठिकाणच्या जत्रांचे स्वरूप तर दिवसेंदिवस फारच विकृत होऊ लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुखच्या जत्रोत्सवात दरवर्षी सुमारे पंधरा ते वीस हजार कोंबड्यांचा बळी देण्यात येतो. ही जत्रा साधारणपणे डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास होते. या जत्रेसाठी दरवर्षी मुंबईकर चाकरमानी व इतर ठिकाणची पाहुणे मंडळी मोठय़ा संख्येने येत असतात. या सर्वांकडून दिल्या जाणार्‍या त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक घरातून एक व परगावी लग्न करून दिलेल्या मुलीच्या घरातून एक अशा प्रकारे जमणार्‍या असंख्य कोंबड्यांचा या ठिकाणी बळी दिला जातो. कोंबड्यांचा बळी देणार्‍यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. बळीच्या या प्रकारामुळे जत्रा परिसरात रक्तामांसाचा चिखल होऊन जातो. मरणाच्या वाटेवरील कोंबड्यांचा आर्त कलकलाट, लोकांचा गोंगाट यामुळे श्री देव घोडेमुखच्या मंदिरातील मंगल वातावरण नष्ट होते.
काही जत्रांमधून होणारी रेड्यांची झुंज, बैलांच्या तसेच बैलगाड्यांच्या शर्यती आणि त्यासाठी मुक्या प्राण्यांना होणारी मारझोड हे प्रकारही माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. लोकप्रबोधनाद्वारे हे सारे अमंगल प्रकार हळूहळू बंद करत आ

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search