शाओमी, आसुस, मोटोरोला यासारख्या मोबाइल कंपन्या फोन ब्राँण्डच्या माध्यमातून भारतातील आपली भागदारी वाढविण्यासाठी या वर्षभरात देशामध्ये जवळपास 1400 ते 1500 नवे मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. असे 91मोबाइल डॉट कॉमच्या एका अहवालात म्हटले आहे.
“आम्हाला २०१५ मध्ये मोबाइल फोनचे जवळपास 1400-1500 मॉडेल लाँच होण्याची आशा आहे. मागील वर्षी जवळजवळ 1137 मोबाइल लाँच झाले होते. तर २०१३ मध्ये 957 मोबाइल लाँच करण्यात आले होते.” असे अहवालात म्हटले आहे.
शाओमी, मोटोरोला, आसुस, ओबी यासारखे नवे ब्राँण्ड हे नवनवे मॉडेल लाँच करुन आधीपासूनच भारतीय बाजारपेठ पाय रोवलेल्या मोबाइल कंपन्यांना चांगलीच टक्कर देतील. असेही अहवालात म्हणण्यात आले आहे.
नुकताच लाँच करण्यात आलेल्या शाओमीच्या Mi 4 या मोबाइल स्मार्टफोनने भारतीय बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या फोनला प्रचंड मागणी असल्याचेही दिसून आले होते.
अहवालानुसार, २०१३ आणि २०१४ मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा स्मार्टफोन घेणारे ग्राहक अधिक महाग स्मार्टफोन विकत घेत असल्याचे दिसून आले आहे.