२/२८/२०१५

ग्रॅज्युएटससाठी गूगलमध्ये काम करण्याची संधी.जगातल्या सर्वात मोठ्या सर्च इंजिनमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली तर... होय, 'गूगल'मध्ये काम करण्याची संधी ग्रॅज्युएटससाठी निर्माण झालीय.
तुम्हीही पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असेल तर गूगलमध्ये काम करण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते... अर्थातच, गूगलच्या काही अटी तुम्हाला मान्य असतील तर..
गूगलमध्ये इंडियानं 'सेल्स अॅन्ड अकाऊंट मॅनेजमेंट टीम' आणि 'व्हर्टिकल बिझनेस मॅनेजर'च्या पोस्टसाठी भरती केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांकडे बी.ए/बी.एसची डिग्री असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे मास्टर्सची डिग्री किंवा मार्केट, इंडिस्ट्री कॉम्पिटिशन आणि सध्याचा इंडस्ट्री ट्रेंड समजण्याची क्षमता असेल त्यांना प्राथमिकता दिली जाईल.
गुडगाव आणि हरियाणा या जागांसाठी गूगलचा हा फूलटाईम जॉब असेल.
संदर्भ:झी २४ तास
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search