मराठी असे माझी माउली
मराठी होते माझी सावली
बोली अनेक असती जरीही
मुखी मराठी पावलोपावली
मराठी बाणा मराठी कणा
मराठी आधार मराठी जना
महाराष्ट्राच्या घरोघरी
मराठीचीच उपासना
ओठी मराठी पोटी मराठी
सकळांची रोजीरोटी मराठी
आस मराठी घास मराठी
महाराष्ट्राचा श्वास मराठी
मराठी असे आमचा प्राण
मराठी आमचा स्वाभिमान
अमृताशी पैज जिंके
असा मराठीचा असे मान ll
ll ..सर्व मराठी जनांना आणि जे मराठीवर प्रेम करतात त्या सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा..ll
संदर्भ: facebook share
लेखक : anonymous