२/०८/२०१५

सहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे. 
 कन्नड, तमिळ, तेलुगू आणि संस्कृत या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे.मराठी भाषा २ हजार वर्षापूर्वीची असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. कन्नड, तेलगूनंतर आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी चर्चा करून मराठी दिनापूर्वी बैठक घेण्याचा आग्रह धरला होता. तब्बल दीड वर्षे रखडलेली साहित्य आकादमीच्या भाषा समितीची बैठक बुधवारी सात तास चालली. अनेक गुंता गुंतीचे विषय सदस्यांनी या बैठकीत उपस्थित केले. त्यांनाही माय मराठी पुरून उरली. प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या समितीचा अहवाल यासाठी महत्वाचा ठरला. 
- भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी. ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी मौल्यवान वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असावे.
- भाषेची परंपरा तिची स्वत:ची असावी.
- भाषेचे आधुनिक रूप हे प्राचीन रूपांहून भिन्न असल्यास चालेल, पण त्यात आंतरिक नातं असावं.
- हे चारही निकष मराठीनं पूर्ण केले.
राष्ट्रीय भाषा समितीच्या बैठकीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्ययाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. भारत सरकारचे निमंत्रित सदस्य भालचंद्र नेमाडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. यावेळी देशविदेशातील सात सदस्य उपस्थित होते.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search