कट्यार हे मराठा पध्दतीचे शस्त्र आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र होते. त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार नेहमीच असायची. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा दंडक होता की, प्रत्येक सैनिकाजवळ तलवार, ढाल या प्रमुख शस्त्रांबरोबर एक छोटे शस्त्र असले पाहिजे, जसे शेल्यामधील कट्यार, अथवा अस्तनीमध्ये बिचवा. युध्दात वेळप्रसंगी हे शस्त्र वापरता येत असे.
कट्यार हे छोट्या शस्त्रांपैकीसर्वात प्रभावी शस्त्र आहे; त्यामुळे त्याला भारतभर प्रसिध्दी मिळाली व वेगवेगळ्याराज्यकर्त्यांनी आपल्या कारागिराकडून कट्यारी बनवून घेतल्या. त्या कट्यारींवर त्या-त्या प्रदेशांची छाप पडली व कट्यारीचे अनेक प्रकार तयार झाले. राजा, राणी व दरबारातील मान्यवर सतत आपल्याबरोबर कट्यार बाळगत असत. कट्यारीची लांबी १० इंच ते २० इंच च्या दरम्यान असते. कट्यारीचे पाते, नख्या व मूठ हे तीन भाग असतात. हे तीनही भाग अखंड धातूमध्ये ओतून कट्यार बनविली जाते. काही कट्यारींमध्ये हे तीनही भाग रिव्हेटने एकत्र जोडलेले असतात.
कट्यारीचे प्रकार:
१) मराठा कट्यार:- १० ते २० इंच लांबीची अखंड ओतीव असते, तिचा अर्धाभाग पकडण्यासाठी असून हाताचे संरक्षण करण्यासाठी दोनउभ्या पट्‌ट्या असतात.
२) मुघल कट्यार:- पाते, नख्या, मूठ असे कट्यारीचे तीन भाग रिबेटने जोडलेले असतात पाते बहुतांश:तलवारीच ेच वापरतात नख्या व मूठ यांच्यावर नक्षीकाम केलेले असते.
३) हैद्राबादी कट्यार:- याचे पाते लांब व रुंद असते ते पातळ पत्र्याचे बनविलेले असते. या कट्यारीत हाताचे संरक्षण करण्यासाठी मूठीवर संरक्षण कवचअसते, त्यामुळे मनगटापर्यंत हाताचे संरक्षण होते. हैद्राबादी कट्यारी १५ इंचापासून २५ इंचापर्यंत लांब असतात

४) मानकरी कट्यार:- शोभिवंत, मजबूत, जाडजूड व सोन्या चांदीचेनक्षीकाम केलेली असते.
५) सैनिकांची कट्यार:- साधी पण मजबूत असते.
६) स्त्रिया व मुले यांची कट्यार:- स्त्रिया व मुलांसाठी लहान आकाराच्या, कमी वजनाच्या शोभिवंत कट्यारी बनवल्या जात.
कट्यारीचे इतर प्रकारही आहेत जसे, जंबीया, खंजीर, खंजराली, पेशकबज इत्यादी.
चिलखत भेदी कट्यार
एक संहारक अस्त्र म्हणुन देखिल कट्यार वापरली जावु शकते ….हा एक कट्यारीचा उत्तम प्रकार असुन या कट्यारीत पात्याच्या टोकाकडील भागाजवळ पात्याची जाडी (रुंदी) जास्त असते ..पाते किंचित फ़ुगलेले असते ..त्यामुळे पात्याला जास्त ताकद मिळते .अशीकट्यार चिलखत देखिल फ़ाडुन आत वार करते ..
यांच्या पात्याच्या टोका जवळील(टिप) भाग वेगवेगळा असतो ..
कधी कधी युद्धा मध्ये तुटलेल्या तलवारींची पाती देखिल वाया न घालावता त्यापासुन देखिल कट्यारी बनवल्या जात होत्या ..तुटलेल्या पात्यांना कट्यारीची मुठ बसवुन..हत्यार पुर्ण केले जात असे..म्हणुनच बरेच दा आपल्याला पात्याची कमी अधिक उंची कट्यारी दिसतात ..

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita