नेहमी प्रमाणे गोड हसशील
काय झालंय? सवाल करशील
मी तुझ्यापासून तुलाच मागणार आहे
मी तुला सगळ सांगणार आहे
आश्चर्याने मागे सरशील
कदाचित तू नाही म्हणशील
किवा कदाचित माझ्याकडून
असली अपेक्षाच नव्हती म्हणशील
तुझा कसलाही निर्णय
मला केवळ छळणार आहे
तरीही मी न लपवता
मनात चाललेली ढवळाढवळं
तुला दाखवणार आहे
तुझ्याशी भेट
योगायोग कशी म्हणू ?
का गुंतले ?
जन्माजन्माचे नात आहे जणू ?
मला पार वेडावलं आहे
या प्रश्नाने
हे वादळ पेलणार नाही मी एकट्याने
माझ्याबरोबर तुलाही यात ओढणार आहे
मी तुला सगळ सांगणार आहे