२/१२/२०१५

आठवणीने तुझ्या........


आठवणीत तुझ्या नाही आवरता
आले अश्रूंना माझ्या , 
एक आला हुंदका अन झापडं मिटली तरी 
नाही सावरता आल्या आठवणी तुझ्या ,
अजून किती वाट पहावी तुझी हे विचारता मनाला 
तेही गहिवरले आठवणीने तुझ्या ,
काळजाने एक साद घातली तुला अन त्याचाही 
आवाज अनावर झाला आठवणीने तुझ्या ,
ऐकू येईल कधीतरी तुला आवाज या भावनांचा अन मग 
तूही यडूले भान हरपशील आठवणीने माझ्या ,
विश्वास आहे मला की तूही कधीच विसरणार नाहीस मला पण 
थांबव आता वेडं झालय हे मन टपोरी आठवणींनी तुझ्या .

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search