२/०९/२०१५

वाटलं नव्हत कधी असही कधी घडेल...वाटलं नव्हत कधी असही कधी घडेल.....! 
एक गोड सोनपरी 
माझ्या प्रेमात पडेल.. 
Mobile वर अधून मधून मला एखादा Msg 
पाठवेल... 
हळूच एखादा Miss call 
करून मला ती सतावेल... 
वाटलं नव्हत कधी 
असही कधी घडेल...! 
स्वप्नांमध्ये माझ्या हळूच 
कोणीतरी शिरेल... 
बोलायला "काहीच नाही" 
म्हणून फोनवर तासभर बोलेल... 
आणि नेमक महत्वाच 
बोलताना फोन ठेवण्याची 
घाई करेल... 
वाटलं नव्हत कधी 
असही कधी घडेल...! 
माझ्याही आठवणीत 
रात्रभर कोणीतरी जागेल... 
तिच्या विरहाचे चार दिवस 
चार जन्माचे अंतर दाखवेल... 
आणि तास-दोन तासांची भेट 
सुद्धा क्षणभर वाटेल... 
वाटलं नव्हत कधी असही 
कधी घडेल...! 
या एकाकी जीवना मध्ये 
त्यापरीचा प्रेमाचा स्पर्श लाभेल... 
वाटलं नव्हत कधी असही 
कधी घडेल...! 
एक गोड सोनपरी 
माझ्या प्रेमात पडेल... 
पण अस कधी घडेल....


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search