२/१४/२०१५

नकोच मजला आता,साथ उगा कुणाचीनकोच मजला आता,साथ उगा कुणाची
कशास करती पुन्हा,बात फुका प्रेमाची !

राहिलो न मीच माझा,तरी, झालो न तुझा 
केला बहाल वसंत,ओढ तुला उन्हाची !

गळती फुलल्या कळ्या,गंध मागे ठेवुनि
पुसून त्या आठवणी,झालीस तू कुणाची ?

उगीच गुंतले मन,जडले काट्यावरी
कशास रंगवू पाने,रक्ताने गुलाबाची !

देईन हवे तेवढे,प्रेम माझे मलाच
नको पुन्हा रेखाटाया,रांगोळी आयुष्याची !

कळेल जेव्हा, येशिल, दोन थेंब घेऊनि
सांग विझवतील का,आग माझ्या चितेची ?

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search