काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं...

अन काय हे प्रेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं.. 

त्याचं प्रेम म्हणजे त्याने 
तिला दिलेलं पहिल- वहिल ग्रेटिंग.. 
अन आमच हे पिरेम म्हंजी 
शेजारच्या बाळ्यान लावून दिलेली सेटिंग..  

त्याचं ते प्रेम म्हणजे 
दोन पाखरांची गोड गुलाबी मजा.. 
अन आमच हे पिरेम म्हंजी 
साऱ्या गावभर झालेला गाजावाजा.. 

त्याचं ते प्रेम म्हणजे 
चौपाटीवाल्या फाईव्हस्टार मध्ये डेट.. 
अन आमच हे पिरेम म्हंजी 
गावच्या बंधाऱ्यावरची पाच मिनटाची भेट... 

पण त्याचं ते प्रेम म्हणजे चार 
दिवसात होणारा ब्रेकअप... 
अन आमच हे पिरेम म्हंजी 
आयुष्यभर चालणारा सेटअप... 
Blogger द्वारा समर्थित.