आता तीच्यावर कवीता मला सुचतच नाही.... 
आता तीच्यावर कवीता 
मला सुचतच नाही. 
कारण ती मला आजकाल 
दिसतच नाही. सतत मी फक्त तीलाच 
शोधत फिरत असतो. 
पण ती दिसल्यावर तीला 
न पाहिल्या सारखे भासवतो. 
असे मी का केलं म्हणुन 
स्वतावरच रागावतो. 
खरच तीच्यवर प्रेम 
तर मी खुप करतो. 
पण तीला हे सांगायला 
पण खुप घाबरतो. 
तरीही सांगायचा तिला 
निर्धार करतो. 
पण ती नाही बोलली 
तर माझे काय? असाही 
मी विचार करतो. 
म्हणुनच थांबलोय मी 
योग्य वेळेची वाट पाहत. 
कढतोय प्रत्येक रात्र 
तीच्या आठवणीत जागत.


Blogger द्वारा समर्थित.