तुझ्यात माझं हरवत जाणं 
तुझ्या मनास कळत होतं 
मी सावरू पहात असतांना 
तुझं मन गुंतवत होतं 

तू रहात होतीस अबोल 
नजरेच्या इशाऱ्यांनी बोलणं होतं 
तू हळूच गोड हसल्यावर 
माझं मन फसत होतं 

तू घालत होतीस अंबाडा 
मनास वेड लागत होतं 
कधी मोकळ्या कुरळ्या केसांत 
नकळत ते गुंतत होतं 

मी डूबत चाललो असतांना 
तुझ्या मनास आवडत होतं 
तुझं अबोल मनच मला 
प्रेमाची साद घालत होतं.
Blogger द्वारा समर्थित.