२/२७/२०१५

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे का ....


तो म्हणाला होता प्रेम आहे माझे तुझ्यावर
नाही उमजला अर्थ तेव्हा त्याच्या बोलण्याचा
आज माझ्याजवळं तो नाही पण
त्याची प्रत्येक आठवण सांधते आहे
न कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधते आहे..
कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुरलेले कान ......
पावसात शब्दांच्या चिंबं विसरलेल देह्भान .....
कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी मी
का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव
कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
शब्द नको उसने, तो डोळ्यातूनच बोले
कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला त्याचा विचार ..
कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर...
ठेचं लागताच मला, त्याचा फुटलेला अश्रुंचा पाझर...
कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेले
अश्रूंच्या दवबिंदूसंगे वेड लागलेले ......
आता मात्र शब्दही लागलेत अपुरे पडू
भावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ?
पण आता कळतयं….
प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे
आपले विसरून दुसर्‍याच्या विश्वात रमणे ....संदर्भ: facebook share
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search