२/११/२०१५

देवा इतकंच दे!


त्याला पूर्ण बाटली दे, मला माझी चपटी दे 
नशीब नाही दिलं तरी, एक रिती धोपटी दे

काळी गोरी बुटकी दे, जाड अथवा लुकडी दे 
नाकावर राग नसावा, बायको मज नकटी दे 

पोळी भाजी नको मला, केवळ प्रेमळ साथ दे
भात खाइन नुसताच मी, पाण्याची आमटी दे 

भाज्या डाळी महागले , चूल कधीची बंद रे
भिक मागायला सरकार, बस एक करवंटी दे

चहा पितो टपरीवर मी, ही माझी अवकात रे 
शान मारायला खोटी, मिटिंगमधे ग्रीन टि दे 

संसारात रमलोय मी, वेळ नाही भजनाला 
नाम घेईन देवा मी, बस थोड्या कटकटी दे

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search