२/२८/२०१५

ट्विटरवरून शोधा नोकरी!


मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरत रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. एका ट्विटर सर्वेक्षणानुसार, ब्रिटनमध्ये ७७ टक्के ट्विटर ग्राहकांचं म्हणणं आहे की, या प्लॅटफॉर्मवरून त्यांना रोजगार शोधण्याची संधी मिळावी.

आपली योजना कार्यान्वित करण्यासाठी ट्विटर ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, डेलोइट्टे किंवा नेस्ले सारख्या कंपन्यांसोबत काम करणार आहे. जेणेकरून लोकांना रोजगार उपलब्ध होईल.लोकांच्या मते ट्विटर हे माध्यम तरुणांना रोजगार शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल. फोर्ब्स मासिकातील एका रिपोर्टनुसार ट्विटर लवकरच आपलं पहिलं ब्रिटिश रोजगार संस्कार सुरू करणार आहे. वेबसाइट 'लिंक़्डइन'साठी ही बातमी वाईट ठरू शकते. कारण सध्या लिंक्डइन रोजगार मिळविण्यासाठी एक योग्य मंच ठरलाय.

ट्विटरमध्ये काम शोधतांना आणि एक चांगली बातमी म्हणजे, आपण नोकरी बदलणार आहात, शोधत आहात ही माहिती गुप्त ठेवली जाईल. जी लिंक्डइनवर लगेच माहिती होते. तसंही कोणत्याही कर्मचाऱ्याला आपल्या बॉससमोर दुसरी नोकरी शोधत असल्याचं कळू द्यायचं नसतं.संदर्भ:झी २४ तास
लेखक : anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search