२/२७/२०१५

अजय वढावकर यांचं आज पुण्यात निधन झालं


हरहुन्नरी कलाकार अजय वढावकर यांचं आज पुण्यात निधन झालं. अनेक दिवसांपासून ते कॅन्सरने त्रस्त होते. काही वर्षांपूर्वी मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांना आपला पाय गमवावा लागला होता

वढावकर यांनी दूरदर्शनवर दिसलेल्या 'नुक्क़ड' या मालिकेत साकारलेली गणपत हवालदार ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

केवळ मालिकाच नाही तर अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांतूनही त्यांनी विविध भूमिका साकारल्या. फिर भी दिल हे हिंदुस्तानी, येस बॉस, इंग्लिश बाबू देसी मॅन अशा हिंदी सिनेमातही त्यांनी कामगिरी बजावली होती.

'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतली त्यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती...


संदर्भ: २४ तास
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search