सोनी कंपनीनं आपला नवा हॅन्डसेट 'एक्सपेरिया ई ४' भारतीय बाजारात लॉन्च केलाय. येत्या दोन आठवड्यांत हा फोन मोबाईल स्टोअर्समध्ये उपलब्ध होऊ शकेल. 
या फोनमध्ये सिंगल सिम आणि डबल सिम असे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत. कंपनीकडून अजूनही या दोन फोनच्या किंमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. 'एक्सपेरिया ई ३' प्रमाणे हा फोनही मिड-रेंज सेगमेंटसाठी असेल. 
'सोनी एक्सपेरिया ई ४'मध्ये २३०० मेगाहर्टझ पॉवरची बॅटरी दिली गेलीय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बॅटरी दोन दिवसांचा टॉकटाईम देते. 
या फोनमध्ये बॅटरी स्टॅमिना आणि अल्ट्रा स्टॅमिना मोड दिले गेलेत. यामुळे, फोनमध्ये बॅटरी कमी असेल अशा वेळी अनावश्यक अॅप्स आणि बॅकग्राऊंड विंडोज बंद होतात. यामुळे, बॅटरी पॉवरची बचत होते. 
सोनी एक्सपेरिया ई ४ अँन्ड्रॉईड किटकॅट ४.४.४ व्हर्जनवर काम करतो. हा फोन 'लॉलीपॉप' अपडेटसोबत येईल किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. 
या फोनमध्ये ५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले (५४०X९६० पिक्सल रिझोल्युशन), १.३ गिगाहर्टज क्वाड-कोअर मीडियाटेक प्रोसेसर उपलब्ध आहे. मल्टिटास्किंगसाठी १ जीबी रॅम आहे. त्यामुळे, हेवी गेम्स खेळताना हा फोन हँग होम्याची शक्यता आहे. 
पांढऱ्या आणि काळ्या अशा दोन रंगांत हा फोन लॉन्च करण्यात आलाय. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमरा आहे. एलईडी फ्लॅशही दिला गेलाय. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेलाय. ८ जीबी इंटरनल मेमरी उपलब्ध असली तर मेमडी कार्डच्या साहाय्याने ती वाढवता येऊ शकते. 
Blogger द्वारा समर्थित.