सिझलरसाठी ज्या भाज्या दिसायला कलरफुल असतील, अशा घेतल्यास डिश चविष्टही होतेच दिसतेही छान. बटाटे, भोपळी मिरची, फ्लॉवर, कोबी, बिन्स, मटार, टोमॅटो, ब्रोकोली, बेबी कॉर्न, केशरी गाजर अशा भाज्या वापरता येतात. मश्रुम, पनीर, सोया यासारखे पदार्थ या भाज्यांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी उपयोगी पडतात. व्हेज सिझलरमध्ये आवडीच्या भाज्या वापरायच्या. पण त्याचा मूळ स्वाद कायम राहावा, याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी भाज्या खूप जास्त शिजवू नका. हॉटेलमध्ये सिझलर्स खाण्याची मजा काही औरच असते. पण घरी​ सिझलर प्लेट नसल्यास कोटेट तव्याचा वापर करूनही सिझलर्स बनवता येतात.


हॉटेलमध्ये सिझलर ऑर्डर केल्यानंतर जेव्हा ते आपल्या टेबलवर येते, तेव्हा हॉटेलमध्ये आलेला प्रत्येक जण आपल्याकडे कौतुकाने पाहतोय, हे लक्षात. येते. गरमागरम सिझलर प्लेटवरच्या भाज्यांवर लोणी टाकून त्याचा चर्र असा आवाज आला की आपली भूक चाळवते. सिझलर प्लेटमधल्या पदार्थांची रचनाही अशी असते, की नुसत्या पाहण्यानेही तृप्त व्हावं. खरं वन पॉट मिल असं म्हटली जाणारी डिश व्हेज आणि नॉन व्हेज खाणाऱ्यांना सिझलर आवडतंच. त्याहीपेक्षा पावसाळ्यात ही रेसिपी म्हणजे पोटाला फारसा त्रास न देणारी. शिवाय बिर्याणी किंवा पुलावपेक्षा किंवा रोटी-भाजीपेक्षा सिझलर कधीही बेस्ट. पण पाऊस पडत असताना हॉटेल जाण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नाही अशावेळी घरच्या घरी चविष्ट सिझलर बनवून पाहायला काहीच हरकत नाही.


सिझलरसाठी ज्या भाज्या दिसायला कलरफुल असतील, अशा घेतल्यास डिश चविष्टही होतेच दिसतेही छान. बटाटे, भोपळी मिरची, फ्लॉवर, कोबी, बिन्स, मटार, टोमॅटो, ब्रोकोली, बेबी कॉर्न, केशरी गाजर अशा भाज्या वापरता येतात. मश्रुम, पनीर, सोया यासारखे पदार्थ या भाज्यांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी उपयोगी पडतात. व्हेज सिझलरमध्ये आवडीच्या भाज्या वापरायच्या. पण त्याचा मूळ स्वाद कायम राहावा, याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी भाज्या खूप जास्त शिजवू नका.


ही रेसिपी बनवण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची म्हणजे तयारी करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. भाज्या किंवा चिकन आणि बनवून ठेवता येत नाही. पण सिझलर कशाही प्रकारे बनवता येतात. म्हणजे त्यात तुम्हाला आवडेल त्या पदार्थांचा वापर करता येतो. उदा. पनीर टिक्का सिझलर, शिग कबाब सिझलर, पास्ता सिझलर.


हॉटेलमध्ये सिझलर्स खाण्याची मजा काही औरच असते. पण घरी​ सिझलर प्लेट नसल्यास कोटेट तव्याचा वापर करूनही सिझलर्स बनवता येतात. घरच्या घरी सिझलर बनवण्यासाठी एक बेसिक आणि अगदी सोप्पी पाककृती पुढीलप्रमाणे-


दोन मध्यम कांदे, एक बटाटा, सात-आठ बिन्स, एक कप फ्लॉवरचे तुरे, एक भोपळी मिरची, दोन टोमॅटो, अर्धे गाजर (केशरी), तीन-चार हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, दोन चमचे तेल, एक चमचा लोणी, मीठ, कोबीची तीन ते चार पाने.


गाजर, भोपळी मिरची, बिन्स आणि बटाटे लांब पण एकसारख्या आकारात कापून घ्या. कांदे उभे चिरून घ्या. सिमला मिरचीचेही लांब तुकडे करा. बटाटे, बिन्स, फ्लॉवरचे तुरे आणि गाजर अर्धवट वाफवून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदे आणि हिरव्या मिरच्या घालून तो कांदा पारदर्शक होईपर्यंत परता. त्यात उकडलेल्या भाज्या आणि मीठ घाला. एकत्र करून काही मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर त्यात टोमॅटोचे तुकडे आणि भोपळी मिरची टाका. मिरची पावडर, हळद, जिरे पावडर घालून शिजवून घ्या. सिझलिंग प्लेटमध्ये कोबीची पाने लावून त्यावर या भाज्यांचे मिश्रण ओता. चमचाभर लोणी सगळ्या भाज्यांवर टाकून ही प्लेट गरम तव्यावर ठेवा.


सिझलरची ही बेसिक पाककृती तयार केल्यावर तुमचं काम संपत नाही कारण ती सर्व्ह करण्यात खरी कसोटी लागते. भात किंवा पुलाव, फ्रेंच फ्राइज किंवा कटलेट सोबत लागतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी उकडलेली अंडी, फ्रेंच टोस्ट असे पर्याय असतात. अर्थात या दोन्ही गोष्टी सिझलर बनवतानाच करता येतात.


​तुमच्याकडे सिझलिंग प्लेट नसेल तर नाराज व्हायचं काहीच कारण नाही. गरम तव्यावर थेट कोबीची पानं ठेवून ​भाज्या आणि अन्य पदार्थ थेट सर्व्ह करायचे. फक्त ते थंड होऊ देऊ नका. तव्यावर सगळे पदार्थ अरेंज केल्यानंतर लगेच तो तवा डायनिंग टेबलवर आणायला हवा. या व्हेज सिझलरमध्ये पनीर, बेबी कॉर्न, स्वीटकॉर्न, मश्रुम असंही घालून ही डिश आणखी चवदार बनवता येईल. सिझलर वाढताना भाज्यांच्याशेजारी भात किंवा तवा पुलाव, उकडलेले मटार, फ्रेंच फ्राइज किंवा बटाट्याचे कटलेट ठेवून ही डिश सर्व्ह केली जाते. भाज्यांमध्ये कधी कधी अननस, सफरचंदाच्या फोडींचा वापर करता येतो. भाज्या ओलसर असल्या पाहिजेत. जर त्या कोरड्या झाल्या तर त्यावर पाण्याचा हबका मारून सर्व्ह करण्यापूर्वी पुन्हा एकदा गरम करून घ्याव्या म्हणजे सिझलर टेस्टी लागतात.


चिकन सिझलर बनवण्यासाठी चिकन ब्रेस्ट, दोन चमचे आलं लसूण पेस्ट, तीन-चार मिरच्या, दोन कांदे, एक चमचा दही, मिरची पावडर, हळद, पाव चमचा सोया सॉस, काळी मिरी पावडर चिमूटभर, कोथंबीर दोन चमचे.


चिकन ब्रेस्टचे मध्यम आकारांचे तुकडे करायचेय. तेल सोडून बाकी सगळे पदार्थ एका बाऊलमध्ये मिक्स करायचे. हे चिकन मॅरिनेशनसाठी दोन-तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं. मग चिकनमधलं पाणी काढून ते चिकन तळून घ्यायचं. चिकन दोन्ही बाजूने ब्राऊन होईपर्यंत तळायचं. हे चिकन गरम सिझलर प्लेटमध्ये काढून घ्या. बाकी व्हेज सिझलरप्रमाणे अरेंज करा.


संदर्भ: Maharashtra Times

लेखक :अपर्णा पाटील


वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita