लग्नाची गाठी आभाळात बांधल्या जातात, हे आजवर ऐकलं होतं... पण, याच लग्नाच्या गाठी एका मोबाईल अॅपद्वारेही बांधल्या जाऊ शकतात, याचा प्रत्यय सध्या मुंबईतलेही तरुण-तरुणी घेताना दिसतायत.
एव्हाना, अमेरिकेत 'ऑनलाईन डेटिंग'साठी ओळखलं जाणारं 'टिंडर' हे अॅप आता मुंबईतल्याही तरुण-तरुणींच्या मोबाईलमध्ये दिसू लागलंय. अनेकांनी हे अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केलंय, फेसबुकशी जोडलंय... आणि सध्या ते आपल्या 'राईट पर्सन'चा शोध या अॅपद्वारे घेत आहेत.
असं असलं तरी या मोबाईल अॅपवर टीका करणारेही काही कमी नाहीत. मोबाईलवरून आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीला, आपल्या जोडीदाराला शोधण्यापेक्षा आपल्याला पत्यक्ष जीवनात या व्यक्तींना भेटायला आणि मग त्यांच्या प्रेमात पडायला आवडेल, असंही अनेक तरुण-तरुणी सुचवतायत.
काय आहे 'टिंडर'...????
टिंडरद्वारे आपल्या युझर्सना अनेक प्रोफाईल्सची लिस्ट सादर केली जाते.... खाली, वर, डावीकडे, उजवीकडे अशी स्क्रीनवर ही लिस्ट फिरवता येते. यातील प्रत्येक हालचाल ठरवते की दुसरी प्रोफाईल तुमच्या प्रोफाईलशी मॅच होतेय किंवा नाही...
जर तुम्ही डावीकडे स्वीप केलं तर त्याचा अर्थ आहे 'नॉप्स'... अर्थातच, समोरच्या व्यक्तीची पोफाईल तुम्हाला पसंत नाही. उजवीकडे स्वीप केलं तर त्याचा अर्थ आहे 'लाईक'... अर्थात, समोरच्या व्यक्तीचं प्रोफाईल तुम्हाला आवडलंय.
पण, जर दोन व्यक्तींनी एकमेकांना स्वीप केलं तर ते 'मॅच' ठरतं आणि टिंडर तुम्हाला ऑनलाईन चॅटींगची संधी देतं.... इतकंच नाही तर एकमेकांना भेटायचं असल्यास तसं तुम्ही या अॅपद्वारे विचारूही शकता.
ऑगस्ट २०१२ साली टिंडर लॉन्च करण्यात आलं होतं. 'बेस्ट न्यू स्टार्ट अप २०१३' म्हणून या अॅपनं क्रन्ची अवॉर्डही पटकावला. आत्तापर्यंत १.५ अब्ज युझर्सनी हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलंय.
डेस्कटॉपवर हे अॅप उपलब्ध नाही. तुम्ही, तुमच्या मोबाईलवर हे अॅप डाऊनलोड करताच ते ऑटोमॅटिकली तुमच्या फेसबुक अकाऊंटशी जोडलं जातं.
२ किलोमीटर ते १६१ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीशी ऑनलाईन डेटिंग करण्याची संधी या अॅपद्वारे मिळते. काही सिलेक्टेड प्रोफाईलशी चॅट करण्याची संधीही युझर्सना मिळते.
Shop thought any advertising links on this website and get upto 50% off on your smartphone purchase.
संदर्भ:झी २४ तास
लेखक : anonymous