२/१८/२०१५

डायबिटीजसाठी उपयुक्त काय आहे?


भेंडी खाण्यासाठी जशी स्वादिष्ट आहे, तसेच त्यात जीवनसत्त्वाचे प्रमाण ही भरपूर आहे. भेंडीचं वनस्पती नाव एबेल्मोस्कस एस्कुलेंटस आहे. 
लोक भेंडीला फक्त भाजीच्या रुपातच बघतात, मात्र आदिवासी समाजात आजाराच्या उपयोगासाठी करतात. 
भेंडीमध्ये व्हिटॉमिन ए, बी, सी, ई आणि के तसेच कॅल्शियम, लोह आणि जस्त अशा अनेक उपयुक्त गोष्टी असतात. या व्यतिरिक्त भेंडीमध्ये मोठया प्रमाणात फायबर ही असते.
ज्यांना डायबिटीज असेल त्यांनी अर्धीकच्ची भेंड्याची भाजी खावी. गुजरातमधील हर्बल तज्ञांनुसार ताजी हिरवी भेंडी डायबिटीजसाठी खूप लाभदायक असते. 
भेंडींच्या बियांची पावडर ( 5 ग्राम), वेलची ( 5 ग्राम), दालचिनीच्या सालेची पावडर ( 3 ग्राम) आणि काळी मिरी (5 दाने) एकत्र करुन त्यांची पावडर बनवावी.  या मिश्रणाला नेहमी दिवसातून 3 वेळा कोमट पाण्यातून प्यावे. याने खूप फरक पडतो.

काही वेळा भेंडी कापून रात्रभर पाण्यात ठेवल्या जातात. सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायले जाते. भेंडीच्या बिया एकत्र करा. त्यांना कोरड्या करुन त्याची पावडर तयार करा. त्या बिया प्रोटीनयुक्त असतात. चांगल्या आरोग्यासाठी ही उपयुक्त ठरतात. हे चूर्ण लहान मुलांना दिल्याने ते टॉनिकसारखे काम करते. 
मध्य प्रदेश मधील पातालकोटचे भुमका (हर्बल तज्ञ) नपुंसकत्व दूर करण्यासाठी पुरुषांना कच्ची भेंडी खाण्याचा सल्ला देतात. आदिवासी वर्ग शारीरीक आरोग्य चांगले ठेवण्याकरिता भेंडीचा जास्त उपयोग करतात. 
भेंडीला साधारणत 4 ते 5 भागात कापून घ्या, लिंबाचा रस( अर्धा चमचा), डांळिब आणि आवळ्याची पान (5-5 ग्राम) रात्रभर पाण्यात ठेवावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी चांगल्या प्रकारे बारीक करुन नेहमी 2 वेळा सात दिवसा घ्यावे. याने कावीळसारखे रोग होत नाहीत. तसेच ताप, सर्दी, खोकला साठी रामबाण उपाय आहेत. मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search