३/११/२०१५

अॅपल वॉच बाबत 25 महत्त्वाच्या गोष्टी
1. अॅपल वॉचसाठी आयफोनचं 5, 5 सी, 5 एस, 6 किंवा 6 प्लस मॉडेल आवश्यक आहे.
2. अॅपल आयओएस 8.02 मुळे तुमच्या आयफोनवर अॅपल वॉचचं अॅप अॅड होतं. या माध्यमातून तुम्ही अॅपल वॉचसाठी आवश्यक ती अॅप्स डाऊनलोड करु शकता.
3. अॅपल वॉच 18 तास चार्जिंगविना चालू शकतं. अर्थातच तुम्ही केलेल्या युसेजवर चार्जिंग किती काळ टिकणार हे अवलंबून असेल.
4. घड्याळ्याच्या डाव्या बाजूला असलेलं डिजीटल क्राऊन बटण हे अॅपल वॉचचं मुख्य बटण आहे. स्क्रोल, झूम आणि नेव्हिगेट करण्यासाठी हे बटण वापरता येईल
5. अॅपलवॉच मधून तुम्ही एखादा कॉल रिसीव्ह करायचा आहे की नाही, मेसेजला उत्तर द्यायचं आहे का किंवा इमेल वाचायचा का हे ठरवू शकता.
6. डिस्प्लेवर क्लिक करुन मेसेजला प्रीसेट रिप्लाय, किंवा अॅनिमेटेड इमोजी किंवा व्हॉईस मेसेज पाठवू शकता
7. स्क्रीनच्या खालून वरच्या दिशेने स्वाईप केल्यास वेदर, मॅप किंवा म्यूझिक सारखी अॅप्स एका कटाक्षात पाहू शकता
8. इमेल वाचणं आता अॅपवॉचवर सहज शक्य होईल. त्याचजोडीने मेल रीड किंवा अनरीड, आणि एखाद्या फोल्डर किंवा ट्रॅशमध्ये मूव्ह करु शकता
9. अॅपलवॉच वापरणाऱ्या तुमच्या मित्राला तुम्ही स्केच किंवा पल्स म्हणजेच हृदयाचे ठोके पाठवू शकता. स्क्रीनवर दोन बोटं प्रेस करा. मॉनिटर तुमचा हार्ट रेट मोजून हार्टबीट पाठवतं.
10. तुम्ही आणि तुमचा मित्र गर्दीत एकमेकांना शोधू शकत नसाल, तर अॅपलवॉचवरुन तुम्ही तुमचं लोकेशनही सहजपणे पाठवू शकता
11. मनगटावरुन तुम्ही काही बिलंही सहज चुकती करु शकता. अर्थात अॅपलपे ही सुविधा सध्या फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे.
12. इन्स्टाग्राम, नाइके, ट्विटर, वीचॅटसारख्या अॅप्सचा आनंदही लवकरच तुम्ही अॅपलवॉचवर लुटू शकाल
13. व्हॉईस कमांडची सुविधा असल्यामुळे तुमच्या एका आज्ञेसरशी तुम्हा रिमाइंडर लावू शकता किंवा डिरेक्शन्स मिळवू शकता.
14. तुमच्या आवडीनुसार किंवा मूडनुसार तुम्ही अॅपलवॉचवर फेस ठेवू शकता. यात अगदी मिकी माऊसपासून पारंपरिक घड्याळाचे पर्याय उपलब्ध आहेत
15. जीपीएस आणि वाय-फाय जोडून अॅपलवॉच तुम्ही कापलेलं अंतर अॅक्सलरोमीटरवर मोजते.
16. अॅपलवॉच आणि आयफोनमधील माहितीच्या आधारे तुमचा फिटनेस डेटाचाही ट्रॅक ठेवला जातो.
17. फिटनेस डेटाच्या आधारे तुमचे फिटनेस गोल्स आखले जातात. तुम्ही एखादं लक्ष्य यशस्वीपणे गाठल्यास अॅपलवॉच तुमचं कौतुकही करतं.
18. तुम्ही दिवसभरात बर्न केलेल्या कॅलरीज, एक्सरसाईज, इतकंच नाही तर तुम्ही कितीवेळा उभे राहिलात याचीही आकडेमोड केली जाते.
19. तुम्ही खूप वेळ बसून राहिलात तर अॅपलवॉच तुम्हाला हालचाल करण्याची आठवण करुन देते
20. 38 मिमी अॅपलवॉचची किंमत 349 डॉलर (सुमारे 21,910 रुपये) तर 42 मिमी अॅपलवॉचची किंमत 399 डॉलर (सुमारे 25 हजार रुपये) आहे. पांढरा, काळा, हिरवा, गुलाबी आणि निळा असे पाच रंग उपलब्ध आहेत.
21. अॅपलवॉचला लेदर स्ट्रॅप्स, स्टेनलेस स्टील लिंक ब्रेसलेट असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
22. 18 कॅरट सोन्याच्या मुलाम्यासह अॅपलवॉचची किंमत दहा हजार डॉलरच्या घरात जाते
23. अॅपल वॉच 24 एप्रिलपासून अमेरिका, इंग्लंड, जपान, हाँगकाँग, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या नऊ देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
24. पॅरिस, टोकयो, लंडनमधल्या गॅलरीमध्ये 10 एप्रिलपासून प्रिव्ह्यू उपलब्ध आहे.
25. 24 एप्रिलपासून अॅपल स्टोअर्स आणि अॅपल.कॉमवर तसंच काही स्टोअर्समध्ये विक्रीला सुरुवात होईल

संदर्भ: abpmajha
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search