३/०५/२०१५

‘फोनपॅड 7 आणि मेमोपॅड 8’ भारतात लाँचतैवानी कंपनी आसुसने भारतात आपले दोन नवे टॅबलेट लाँच केले आहेत. टॅबलेड फोनपॅड 7 (Fonepad FE171CG) आणि मेमोपॅड 8 (MeMO Pad ME581CL) आहेत. फोनपॅड 7 ची किंमत रु. 10,999 आहे. तर मेमोपॅड 8 ची किंमत रु. 19,999 आहे. हे दोन्ही टॅबलेट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आसुस इंडियाचे दक्षिण आशियाचे रिजनल हेड पीटर चेंग यांनी सांगितले की, “हे नवे टॅबलेट युजर्सचा विचार करुन बनविण्यात आले आहेत. हे वापरण्यास फारच सोपे आहेत. यांची कनेक्टिव्हिटी देखील वेगवान आहे तसेच यांची टेक्नोलॉजी आणि डिझाईन यूजर्संना नक्कीच आवडतील.”
आसुस Fonepad 7:

* 7 इंच डिस्प्ले आणि 1024x600 IPS डिस्प्ले

* ड्युल सिम टॅबलेट

* 4.4 किटकॅट अड्रॉईंड

* प्रोसेसर इंटेल atom Z2520 1.2GHZ आणि 2GB रॅम आहे.

* 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

* इंटरनल मेमरी 16 जीबी तसेच एसडी कार्डने 64 जीबीपर्यंत क्षमता

* 3950mAh बॅटरी क्षमता

आसुस MeMO Pad 8 : 

* 8 इंच स्क्रिन, HD 1920x1200 रेझ्युलेशन IPS डिस्प्ले आणि गोरिल्ला ग्लास 

* 64 जीबी इंटेल एटम Z3580, 2.3 GHz क्वॉड प्रोसेसर आणि 2जीबी रॅम

* 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 1.2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

* 4जी सुविधा, 4.4 किटकॅट अड्रॉईंड

* 16 जीबी इंटरनल मेमरी तसेच एसडी कार्डने 32 जीबीपर्यंत क्षमता

* 4350mAh बॅटरी क्षमता.

संदर्भ: ABP majha
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search