३/२९/२०१५

एचटीसीने डिझायर 820s हा स्मार्टफोन लॉन्च


स्मार्टफोनप्रेमी आणि त्यातही खासकरुन ज्यांना एचटीसीचे मोबाईल हँडसेट ज्यांच्या अधिक पसंतीस पडतात, अशा मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. एचटीसीने डिझायर 820s हा स्मार्टफोन भारतात नुकताच लॉन्च केला आहे. एचटीसी डिझायरची भारतीय बाजारपेठीतल किंमत 25 हजार 500 रुपये ते 24 हजार 890 रुपये यादरम्यान असणार आहे.

डिझायर 820s हा 820 या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अॅडव्हान्स मॉडेल आहे. यामध्ये 1.7 GHz च्या 64 बीट ऑक्टा-कोअर प्रोसेसरसोबतच 5.5 इंचची स्क्रीन असणार आहे. शिवाय अतिशय महत्वाचं म्हणजे 13 मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

HTC डिझायर 820s करे फीचर्स
5.5 इंच एचडी स्क्रीन
720 x 1280 पिक्सेल डिस्प्ले
फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल, रेअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल ज्यामध्ये BSI सेंसरसोबत f/2.2 चा अपॅर्चरही असणार आहे
कॅमेऱ्यामधून प्रकाशातही क्लिअर फोटो काढणं शक्य होणार आहे.
फोनमध्ये 2 जीबीचा रॅम आणि 16 जीबीची इंटर्नल मेमरी
128 जीबीचा मेमरी एसडी कार्ड जोडला जाऊ शकतो
2600mAh ची बॅटरी
4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम ज्यामध्ये HTC सेंसही असेल
फोनमध्ये स्टिरिओ ऑडिओ जॅक, वाय-फायची उत्तम सुविधा
4 जी कनेक्टिव्हिटीचीही सुविधा फोनमध्ये असेल, शिवाय 150 mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड असणार आहे.


संदर्भ:abpmajha
लेखक : anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search