'एचटीसी' कंपनीने बार्सिलोनामध्ये आतापर्यंतचा सर्वात बहुचर्चित स्मार्टफोन 'एचटीसी वन M9'लाँच केला आहे. 'एचटीसी वन M9'हा सॅमसंगचा अग्रगण्य स्मार्टफोन 'सॅमसंग गॅलक्सी S6'शी थेट स्पर्धा करण्यासाठी लाँच केल्याचं म्हटलं जातं. सॅमसंग आणि एचटीसी या दोन्ही कंपन्या MCW2015 अर्थात मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आमनेसामने आहेत.
एचटीसीने सोबतच फिटनेस बँडही लाँच केला आहे. 'एचटीसी वन M9'चं डिझाईन बऱ्यापैकी M8 शी मिळतंजुळतंच आहे. किंबहुना 'एचटीसी वन M9'हा M8 चं अपग्रेडेड वर्जन आहे असं म्हटलं तरी चालेल.
एचटीसीने लक्झरी फोन म्हणून 'एचटीसी वन M9'ग्राहकांना सादर केला आहे. फोनची बॉडी पूर्णपणे मेटॅलिक असून गोल्डन ब्लेझ आहे.
'एचटीसी वन M9'ची फिचर्स :
कॅमेरा - 20.7 मेगापिक्सेलचा रेअर कॅम,
- सेल्फी कॅम 8 अल्ट्रापिक्सेल
प्रोसेसर - 2GHz क्वॉर्ड-कोअर स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर
रॅम - 3 जीबी
इंटर्नल मेमरी- 32 जीबी
ऑपरेटिंग सिस्टम- अपग्रेडेबल अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप
डिस्प्ले- 5 इंच स्क्रीन, फुल एचडी डिस्प्ले
किंमत- 649 डॉलर म्हणजे सुमारे 40 हजार रुपये
संदर्भ:abpmajha
लेखक : anonymous