३/०९/२०१५

मोटो ई सेकंड जनरेशनमोटोरोला कंपनीचा कमी बजेट असलेला मोटो ई सेकंड जनरेशन हा स्मार्टफोन बाजारात धूमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. मोटो ई सेकंड जनरेशन या स्मार्टफोनच्या विक्रीला 10 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

या स्मार्टफोनची किंम 6,999 असून मोटोरोलाच्या इतर स्मार्टफोनप्रमाणे याचीही विक्री फ्लिपकार्टवरच होणार आहे. मोटो ई हा कमी किंमतीत आकर्षक फीचर्स असलेला स्मार्टफोन आहे, त्यामुळे गॅझेटप्रेमींची मोटो-ईकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

मोटोरोलाचा हा स्मार्टफोन लेनोवो A6000, शाओमी रेडमी नोट 4G आणि मायक्रोमॅक्स यू युरेका या स्मार्टफोन्स जबरदस्त टक्कर देईल, असं जाणकारांचं मत आहे.

डिस्प्ले: 4.5 इंचाची 540x960 पिक्सेल रिझॉल्यूशन असलेली स्क्रीन. शिवाय यात गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शनही आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: 5.0 लॉलीपॉप
प्रोसेसर: 1.2 GHZ स्नॅपड्रॅगन 410 क्वॉडकोर
रॅम: 1 GB
स्टोअरेज: 8 GB इंटर्नल स्टोअरोज आणि 32 GB पर्यंत एक्स्पांडेबल
कॅमेरा: 0.3 मेगापिक्सल व्हीजीए फ्रण्ट कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
बॅटरी: 2390mAh


संदर्भ: abpmajha
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search