३/१५/२०१५

व्हॉट्सअॅपवरून कॉलिंग सुरूलोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने युझर्सना आणखी एक फीचर उपलब्ध करून दिलं आहे. व्हॉट्सअॅपने व्हॉईस कॉलिंग फीचर लाँच केलं आहे. तुम्ही जर व्हॉट्सअॅप अपडेट केला, तर आता व्हॉट्सअॅपवरून मेसेजसह कॉलही करू शकणार आहात.

व्हॉट्सअॅपच्या या नव्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन 2.12.7 इंस्टॉल करावं लागेल. व्हॉट्सअॅपचं हे लेटेस्ट व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाऊनलोड करू शकता. याशिवाय व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाईटवरही हे व्हर्जन उपलब्ध आहे.

गुगल प्ले स्टोअरच्या वेगवेगळ्या डिव्हाईसवर वेगवेगळे व्हर्जन उपलब्ध आहेत. जर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये व्हॉट्सअॅपचं हे फीचर मिळालं नाही, तर तुम्ही व्हॉट्सअॅपची वेबसाईटhttp://www.whatsapp.com/android/ इथून हे फीचर इन्स्टॉल करू शकता.

व्हॉट्सअॅपवरून कॉल कसा करायचा?

1) व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट 2.12.7 व्हर्जन डाऊनलोड करा. त्यानंतर ज्यांच्याकडे व्हॉट्सअॅप कॉलिंग फीचर अॅक्टिवेट आहे, त्यांनी तुमच्या मोबाईलवर कॉल केला आणि तुम्ही तो रिसिव्ह केल्यास, तुमच्या स्मार्टफोनवर आपोआप व्हॉट्सअॅप कॉलिंग फीचर अॅक्टिवेट होईल.

2) तुम्ही तो कॉल बंद केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आपोआप व्हॉट्सअॅप कॉलिंगचे सर्व फीचर्स दिसतील.

3) जर हे फीचर्स तुमच्या फोनवर दिसले नाही, तर फोन एकदा रिस्टार्ट करा.

4) हे फीचर अॅक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना कॉल करून, त्यांनाही व्हॉट्सअॅप कॉलिंग फिचर्स अॅक्टिवेट करण्यास मदत करू शकता.

5.) ज्यांना तुम्ही कॉल करणार आहात, त्यांच्याकडेही व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन असणं आवश्यक आहे.

व्हॉट्सअॅप ने कॉलिंग फीचर्ससह कॉन्टॅक लिस्टमध्येही काही बदल केले आहेत. यामुळे व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठी तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक लिस्टमधील नंबर सुचवले जातात.

संदर्भ: abpmajha
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search