३/१७/२०१५

याहू ई-मेलसाठी आता पासवर्डची गरज नाही


ई-मेल अकाऊंट अधिक सुरक्षित करण्यासाठी ‘याहू’ने नवी आयडीया आणली आहे. यापुढे तुम्हाला तुमच्या याहूच्या ईमेलचा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. ज्यावेळी तुम्ही लॉग-इन कराल, तेव्हा कंपनी तुम्हाला प्रत्येकवेळी नवा कोड देईल. त्या कोडनुसार तुम्हाला लॉग-इन करता येणार आहे. हा कोड तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल.

याहूची ‘ऑन डिमांड पासवर्ड’ ही नवी संकल्पना आहे. या नव्या कल्पनेमुळे युजर्सचं अकाऊंट अधिक सुरक्षित होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

पासवर्ड विसरल्यामुळे अनेक वेळा ई-मेल अकाऊंट ओपन करणं किंवा मेल चेक करता येत नाहीत. पासवर्डची ही कटकट मिटवण्यासाठी याहूने ही ‘ऑन डिमांड पासवर्ड’ ही योजना आणली आहे. त्यामुळे आता यापुढे पासवर्ड लक्षात ठेवण्याची कटकट मिटणार आहे. प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ‘वन टाईम पासवर्ड’ उपलब्ध होईल.

याहू या वर्षाअखेरपर्यंत जगभरात सर्वत्र युजर्ससाठी ही सेवा सुरु करणार आहे.

सेटिंग आवश्यक
ही सुविधा सुरु करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पासवर्डने अकांऊट ओपन करावं लागेल. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन ‘ऑन डिमांड पासवर्ड’ अॅक्टिव्हेट करावं लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचं याहू अकाऊंट ओपन कराल, तेव्हा जिथे पासवर्ड विचारला जातो, तिथे सेंड ‘माय पासवर्ड’ असं दिसेल.

यावर क्लिक करताच, कंपनी चार अक्षरांचा पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवेल. तो वापरून तुम्ही तुमचं ई-मेल अकाऊंट ओपन करू शकता.
संदर्भ: abpmajha
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search