३/१०/२०१५

अॅपल’कडून स्मार्ट वॉच लाँच


सॅनफ्रान्सिस्को इथे एका शानदार सोहळ्यात ‘अॅपल’ने त्यांचं बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत अॅपल वॉच लाँच केला आहे. या घड्याळाची किंमत 22 हजारांपासून ते 6 लाख रूपयांपर्यंत आहेत (349 डॉलर्स ते 10 हजार डॉलर्स). येत्या 10 एप्रिलपासून या वॉचसाठीचे बुकींग सुरू होणार असून 24 एप्रिलपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. सध्या 9 देशात ही विक्री सुरू केली जाणार असून त्यात भारताचा समावेश नाही. त्यामुळे भारतीयांना या वॉचसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

अॅपल वॉच दोन साईज (38 आणि 42 मीमी) आणि अॅपल वॉच, वॉच एडिशन आणि वॉच स्पोर्टस अशा तीन प्रकारात आहे. या वॉचसाठी अनेक फिचर्स दिली गेली आहे. अॅपल वॉच आणि वॉच एडिशनमध्ये स्क्रीनला काही होऊ नये म्हणून सफायर क्रिस्टलचा वापर केला आहे तर वॉच स्पोर्टससाठी आयन एक्स ग्लास लावली आहे.

वॉच युजर त्यांची महत्त्वाची माहिती स्क्रीनच्या फ्रंटवर ठेवू शकणार आहेत. हे वॉच आयफोनशी सरळ संपर्कात असेल व त्यामुळे आयफोनवर आलेले नोटिफिकेशन घड्याळ्याच्या स्क्रीनवर डिस्प्ले होऊ शकणार आहे. यात इनबिल्ट स्पीकर आणि माईक आहेत त्यामुळे युजर फोनही करू शकतील. तसंच संगीतप्रेमींसाठी गाणी ऐकण्याची सोयही या ऍपल वॉचमध्ये आहे. त्याशिवाय आय मेसेजची सेवा ही या घड्याळाची वैशिष्ट आहे. या वॉचसाठी डिजिटल टच सुविधा आहे तसंच त्यातून स्केच, हार्टबीट्सची रिदमसुद्धा दुसर्‍याला पाठवता येणार आहेत. मात्र ज्याच्याकडे ते पाठवायचे त्याच्याकडेही ऍपल वॉच असणं आवश्यक आहे.


आय वॉचमध्ये अनेक फिटनेस फिचर्सही दिल्या गेल्या आहेत. हॉटेलमध्ये चेकइन आणि खोलीचे लॉक उघडण्यासाठी हॉटेल ऍप, एअरपोर्टजवळ पोहोचताच बोडीर्ंग पास घड्याळच्या स्क्रीनवर डिस्प्ले होण्याची सुविधा अशीही फिचर्स यात आहेत. यावर फोटोही पाहता येतील तसंच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साईट्सचे ऍप्सही यामध्ये उपल्बध करून देण्यात आले आहेत. याची बॅटरी 18 तास चालेल असा कंपनीचा दावा आहे.संदर्भ:IBN Lokmat
लेखक :anonymous
Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search