३/३०/२०१५

गर्भधारणेचं रहस्य
कोणत्याही स्त्रीसाठी आई होण्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. विवाहानंतर साधारणपणे २ वर्षांनी तरी गर्भधारणा व्हावी. त्यासाठी आईवडिलांची शारीरिक आणि मानसिक पूर्वतयारी असणं गरजेचं आहे.

आपण गर्भधारणा कशी होते ते पाहू या!

बीजधारणा -

पाळीच्या साधारण १४ दिवसांनंतर २ अंडाशयांपैकी एका अंडाशयातून परिपक्व बिजांड बाहेर पडतं. ते बीजवाहिन्यांमुळे पकडलं जाऊन पुढच्या प्रवासासाठी पुढे सरकतं. २४ तास हे अंडं जगू शकतं. हे जर प्रजननासाठी वापरलं गेल नाही तर महिन्याच्या पाळीबरोबर ते बाहेर टाकलं जातं.


प्रजनन -
समागमादरम्यान लाखो शुक्राणूंपैकी १ शुक्राणू या अंड्यात प्रवेश करू शकतो आणि ते एकजीव होतात. शुक्राणू ४८ तास जगू शकतात. बीजवाहिन्यांमध्येच बिजांड आणि शुक्राणू एकजीव होतात. त्यातून बीज तयार होतं. काही अवधीतच हे बीज आपल्या पेशी वाढवायला सुरुवात करतात. त्या हळूहळू पुढे सरकतात आणि ४ दिवसांत गर्भाशयाच्या पिशवीत येतात.

चार दिवसांतच त्या एका पाणी भरलेल्या छोट्याशा गोळ्याप्रमाणे किंवा तुती या फळासारख्या दिसू लागतात.

तोपर्यंत पिशवीत एक छान बिछाना आपल्या बाळासाठी तयार केलेला असतो. बाळाला पोषण मिळण्यासाठी हा बिछाना पेशी आणि रक्तवाहिन्यांनी सज्ज असतो.

दोन आठवड्यांचा हा गर्भ मुलगा असेल की मुलगी याची उत्सुकता सर्वांनाच असते.

जन्म देणारी आई असली तरी गर्भातलं बाळ मुलगा असणार की मुलगी हे स्त्रीवर अजिबात अवलंबून नसून ते पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असतं! परंतु आपल्या समाजात या गोष्टीला स्त्री जबाबदार ठरवली जाते आणि तिच्यावर विनाकारण अत्याचार केले जातात.

दोन गूणसूत्रांच्या एकत्र येण्याच्या प्रमाणावर मुलांचं चालणं, वागणं, दिसणं, डोळ्यांचा रंग अवलंबून असतो. आपले आनुवंशिक दोष, आजार आपल्या मुलाकडे जाण्याचीही संभावना असते.


असं बीज गर्भाशयात आल्यावर तरंगत राहतं आणि काही दिवसांनी ते गर्भाशयाच्या आतील भिंतीला चिकटतं. या पेशींच्या घट्ट गोळ्यात आतील भागांमध्ये पाणी तयार होतं. बीज तिसऱ्या आठवड्यापासून गर्भाशयाच्या आंतरभागातून पोषणरसाचं सेवनही करायला लागतं.

शुक्राणूंमधील लिंगदर्शक गुणसूत्रं लांब असल्यास ३ गुणसूत्र तर आखुड असल्यास ४ गुणसूत्र म्हटलं जातं. गुणसूत्रांच्या एकूण २३ जोड्यांपैकी एक जोडी लिंगदर्शक असते.


* स्त्रीमध्ये लिंगदर्शक ३३ गुणसूत्रं असतात, तर पुरुषामध्ये ३४ असतात.


* स्त्रीकडून ३ आणि पुरुषांकडूनही ३ गुणसूत्र घेतलं असल्यास जन्मणारं बाळ ३३ म्हणजे मुलगी असतं.


* आईकडून ३ आणि वडिलांकडून ४ गुणसूत्र घेतलं असल्यास बाळ ३४ म्हणजे मुलगा असतं.


अंडं आणि शुक्राणूमध्ये नेहमी २३ गुणसूत्रं प्रत्येकी असतात. ती एकत्र येऊन ४६ पूर्णपेशी गुणसूत्रं तयार होतात.

संदर्भ:Maharashtra Majha
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search