३/१५/२०१५

आठवड्यातून ३ वेळा सेक्स, सुखी जीवनाचा मंत्र

विवाहीत स्त्री-पुरुषांनो , आपले जीवन सुखी करायचंय... मग आठवड्यातून तीन वेळा सेक्स करा... तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुखी बनेल, हे आमचे मत नाही , तर संशोधकांनी काढलेला हा निष्कर्ष आहे.
या संशोधनात असे म्हटले आहे, की तुम्हांला वैवाहिक जीवन सुखी बनवायचे असल्यास आठवड्यातून तीन वेळा सेक्स आणि दिवसातून चार वेळा आपल्या पती किंवा पत्नीचे चुंबन घेणे गरजेचे आहे. तसेच दिवसातून एकदा तरी आय लव यू म्हटले पाहीजे असाही सल्ला यात दिला आहे.
या संशोधनात आणखी काही खास टिप्स देण्यात आल्या आहेत. आपल्या पतीला किंवा पत्नीला दिवसातून कमीत कमी तीन वेळा मिठीत घेतले, तसेच महिन्यातून दोनवेळा रोमँटिक डिनर केल तर तुमचे वैवाहिक जीवनात सुख आणि सुखच राहील दुखाचे सावट तुमच्या संबंधात येणारही नाही.
अमेरिकेत झालेल्या या सर्वेक्षणात सुमारे ३ हजार जोडप्यांना सामील करून घेण्यात आले. त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी विविध प्रश्न विचारले गेले. या सर्वेक्षणात सामील झालेले जोडप्याचे वय ३१ ते ३२ च्या दरम्यान होते. तसेच त्यांच्या लग्नाला ३ महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेला नव्हता.
सर्वेक्षणानंतर काढलेल्या निकर्षात असे लक्षात आले की, जे जोडपे आठवड्यातून कमी-कमी तीन वेळा सेक्स करतात आणि चार वेळा किस करतात ते सर्वाधिक खुश आहेत. तसेच दररोज एकदा तरी आय लव यू म्हणणा-या जोडप्यांची लाइफ फारच स्मूथ सुरू आहे.संदर्भ: Maharashtra Times
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search