"आई-बाप" "आई-बाप" म्हणजे नक्की काय
असतं?
.
आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं,
अँडव्हान्स
पाठबळ असतं
.
तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं
स्वप्न
पाहिलेलं असतं
.
तुमच्या जन्मापासून
त्यांच्या मरण्यापर्यंत
त्यांनी आपल
आयुष्य खर्चलेल असतं
.
"आई" तुमच्या आयुष्याच्या गाडीच योग्य
दिशा देणार"स्टीयरिंग" असतं
.
अचानक आलेल्या संकटात सावरायला,
बाप म्हणजे
"
अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं
.
"आईच प्रेम" हे रोजच्या आयुष्यात
कामाला येणार
"बँक
बॅलन्स" असतं
.
बाप म्हणजे
गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असत
.
आई म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार,
मोबाईलच"नेटवर्क" असतं
.
कधी "नेटवर्क"थकले; तर बाप,
अर्जेंट"एस.एम.एस." असतं
.
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं,
"अँटी व्हायरस
" असतं
.
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं,"बाप"
हे"क्वारनटाईन" बटण असतं
.
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, 'शिक्षणाच
विद्यापीठ' असते
.
"बाप" म्हणजे चालती बोलती,
अनुभवाची फॅकटरी असते
.
"आई" म्हणजे
तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई
असते
.
बाप म्हणजे कमर् कसून आयुष्यभर
मिळवलेली कमाई
असते
.
आई म्हणजे
तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरु
असतो
दाखवलेल्या वाटेवर"बाप"
हा जवळचा मित्र असतो
.
आई म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर
असतो
त्या परमेश्वरापर्यंतपोचवणारा बाप
एक संत
असतो
.
आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू, हृदय
आणि मन
असतं
.
बाप म्हणजे, भक्कम
ठेवणारा पाठीचा कणाआणि शरीरातलं
हाड
अन्हाड असतं
.
कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई
गंSSS"
असतं
आणि भलेमोठे संकट आलेकी उच्चारात"बाप
रे बाप"
असतं
.
परमेश्वर समोर आला तरी उभे
राहायला वीट
फेकलेल पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात,
विठ्ठलाने
स्वत:लाच
तिथे पाहिलेलं असतं
.
म्हणूनच म्हणतो, .
.
.
परमेश्वर, अध्यात्म, भगवंत- हेसगळ, अजब
गणित
असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं "आई-बाप"
हे
"कनेक्शन"
असतं
.
"आई-बाप" म्हणजे नकळत मागे
असलेली मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत,"मातृ
देवो भव"--
'पितृ देवो भव" म्हणलेलं असतंसंदर्भ: facebook share

लेखक :anonymous


वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita