लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->


आज नेहमी प्रमाणे आठवड्याचा शेवट, म्हणजेच रविवार आला. जो आज काळच्या प्रत्येक कामावर जाणाऱ्या म्हणजेच नोकरी करणाऱ्या वर्गाचा आवडता दिवस. हा एकमेव दिवस असा असतो जेव्हा आमच्या चाळीचे आम्ही सगळे मित्र एकत्र भेटतो आणि ह्या गेल्या आठवड्यात कोणा बरोबर काय – काय किस्से घडले ते एकमेकांशी शेअर करतो... कारण ह्या मुंबईत अशे बरेच किस्से हे एकतर आपल्या बरोबर तरी नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर तरी घडतात, तेच आम्ही एकमेकांशी शेअर करतो... अपेक्षे प्रमाणे आज पुन्हा निलेश चा मिस्ड कॉल आलाय म्हणजेच कट्या वर सगळी पोरं जमली आहेत... हा मी निघतच होतो कि तेवढ्यात आमच्या चाळीतले गणू काका आले... त्यांच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होतं कि ते आज रागात आहेत...

गणू काका म्हणजे आमच्या चाळीतले आधार स्तंब...म्हणजे राजकारणी न्हावे हं.... आज आम्ही सगळी चाळीतली पोरं जे काही आहोत ते त्यांच्या मुळेच... आमच्यातली पोरं हि एक वेळ स्वतः च्या घरच्यांशी एखाद्या विषयावर वाद घालतील. पण गणू काकाकांशी वाद घालनं मात्र शक्य नाही...

तर अशे हे आमचे गणू काका. पण आज आमच्या घरी येतायत, ते पण चेहऱ्यावर एवढा राग दिसतोय म्हणजेच काही तरी घडलंय...अखेर गणू काका आलेच... गणू काका “ काय रे कुठे निघालास एवढ्या सकाळ सकाळ?...” आल्या आल्या अश्या आवाजात विचारलं म्हणजे नक्कीच काही तरी बिनस्लय काकांचं. “अहो अजून कुठे जाणार, नेहमी प्रमाणे कट्यावर.” मी शांत पणे उत्तर दिलं. “आधी मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे , आधी जाऊ नकोस.” काहीश्या चिंतेतला स्वर काढत ते म्हणाले, एवढ्यात निलेशचा पुन्हा फोन आला, मी काकांकडे बघितलं आणि त्याचा फोन उचलून मी आज थोडा उशिरा येईन म्हणून सांगितलं. “बस जरा इकडे.” काका म्हणाले. आणि आम्ही दोघेही बसलो.

“हं, काका बोला काय बोलायचंय ते.” मी नम्र पणे म्हणालो. तशे काका आवाज चढवत म्हणाले “मला बोलायचं नाही विचारायचय.” मी म्हटलं “अरे बापरे, माझ्या हातून काही चूक झाली का काका?” काकांनी पुन्हा आवाज चढवला “मी असं म्हटलं का ?” “नाही, मग काय विचारायचय.?” तरी मी घाबरतच विचारलं.. तसं माझ्या खांद्यावर हाथ ठेवून म्हणाले “ मी जे काही विचारीन त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं, नाही तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव.” मी मोठ्या नखरेत म्हणालो “काका, अहो मीच काय चाळीतला कुठला हि मुलगा तुमच्याशी कधी खोटं बोललाय का ? अहो उलट चाळीतली मुलं ज्या गोष्टी घरी सांगू इच्छित नाही त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगतात... आणि मी तर तुमच्याशी ठरवून सुद्धा खोटं बोलू शकत नाही .” परंतु माझं शेवटचं वाक्य हे मी पुढच्याच मिनिटात खोडून काढलं. काकांनी मग अखेर तो प्रश्न विचारलाच. त्यांनी विचारलं “काय रे मनोज तुझ्या लहानपणी, म्हणजे जेव्हा तू शाळेत जात होतास तेव्हा कोणावर प्रेम वगरे करत होतास का.?” हा प्रश्न काकांनी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी वर दुसर्या विश्व युद्धात जसा सहज अणुबॉम्ब टाकला होता ना तसा अगदी सहज रित्या काकांनी हा प्रश्न मला टाकला आणि मग तो बॉम्ब पडल्या नंतर जी काही हानी त्या दोन शहरांची झाली, तशीच काहीशी परिस्थिती माझीही झाली होती. पण काकांना उत्तर तर द्यायचं होतच “हो ,म्हणजे तशी मला एक मुलगी आवडायची, आमची मैत्री हि चांगलीच जमली होती हो..” हे एवढं बोलता - बोलता काकांकडे लक्ष गेलं आणि पाहतो तर काय मी जणू काही तिच्याशी लग्नच करून आलोय आणि त्यांच्या समोर बसलोय अश्या संदर्भाचा राग हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता , तो आवरण्यसाठी म्हणून लगेच पुढे म्हणालो “ पण हे सगळं दहावी पर्यंतच , नंतर न तर ती मला भेटली न तिचा काही पत्ता मिळाला...” “हो ,पण तुमचं काय ते फेसबुक का काय ते म्हणतात ना, त्याच्यावर म्हणे सगळे लोक मिळतात , त्या वर भेटली असेलच ना ?” काकांनी अगदी खिंडीत पकडलं “नाही काका , नाही म्हणजे फेसबुक वर आहे मी, पण ती नाही माझ्या संपर्कात...” काकांच्या मला खिंडीत पकडण्याच्या प्रयत्नाला मी यश येऊ दिलं नाही. “ पण आज अचानक काय झालं काका? हा प्रश्न पडण्या मागचं कारण कळू शकेल ?” मी न थांबता विचारलं.

काका शांत पणे बोलू लागले “अरे काल मी किराणामाल आणायला बाजारात गेलो होतो , येताना रेशन कार्डची झेरोकस काढायला म्हणून नामदेवच्या दुकानात गेलो, तिथे खूप गर्दी होती म्हणून नामू ने मला बाहेरच खुर्ची आणून दिली आणि चहा दिला , इतक्यात दोन शाळेत जाणाऱ्या मुली तिथे आल्या त्यांना बहुतेक कोणाला तरी फोन करायचा होता...” “हो मग, त्यात काय झालं काका? त्यांना कदाचित शाळेतनं यायला उशीर होणार असेल म्हणून त्या घरी फोन करत असतील...” मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो.

तशे काका भडकले “हो रे ते मला हि कळतं, पण मूळ मुद्दा हा आहे, कि त्या मुलींपैकी एकीनेच फोन लावला आणि त्यात हि नवल वाटण्यासारखं म्हणजे त्यांच्या शाळेतला शिपाई जेव्हा तिथे काही कामासाठी आला तेव्हा त्या मुलीने पटकन फोन ठेवून दिला... तो निघून गेल्यावर त्या मुलीने परत फोन लावला..आणि बोलू लागली...” काकांचा मुद्दा हा काही लक्षात येत न्हवता म्हणून न राहता विचारलं “तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय काका ?”

काका म्हणाले “अरे हि पोरगी असं का करतेय म्हणून मी माझा चहा पीत – पीत माझे कान तिच्या बोलण्या कडे वळवले, तेव्हा काही तरी पुत – पुतली ती, पण समोरच्या व्यक्तीला बहुतेक ऐकू आलं नसावं म्हणून त्याने तिला ते वाक्य पुन्हा म्हणायला लावलं तर ती काय म्हणाली माहितीये ? ...” “काय म्हणाली?” मी हि उत्सुकतेने विचारलं. “ “आय लव्ह यु” हे असं वाक्य म्हणाली... हे वाक्य ऐकून मी नेमका त्याच वेळेला तोंडात घेतलेला चहा, माझ्या नर्डीच्या आत पोह्चायच्या आत बाहेर आला...” काकांचं हे वाक्य ऐकूण मला हसू आवरलं नाही. आणि मी हसत – हसत काकांना म्हणालो “ त्यात काय एवढं सिरिअस होण्यासारखं आहे काका, हि आजच्या काळातली नॉर्मल गोष्ट आहे...” “म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचय? कि हि पोरं ह्या वयात, ह्या ज्या काही गोष्टी करतायत ते सगळं योग्य आहे ?” काकांनी आश्चर्य व्यक्त केला . “ नाही काका ह्या गोष्टी अजिबात योग्य नाहीत, पण काका आजचा काळ हा बदललाय.. हि गोष्ट तरी आपल्याला मान्य करावी लागेलच ना... आणि काका त्या मुलीं बद्दल तुम्हाला का एवढं वाईट वाटतंय हेच मला समजत नाहीये?....” मी त्यांनां काळजी स्वरूपी प्रश्न विचारला. “ नाही रे मला त्या मुली बद्दल वाईट वाटत तर आहेच, पण त्याहूनहि मला काळजी वाटतेय ती त्या मुलीच्या आई - वडिलांची...” “म्हणजे ? मी समजलो नाही..” मी म्हटलं. “ अरे त्या पोरीला उद्या जर का त्या मुलाने फसवलं आणि काही गैरफायदा घेतला तर, तर तिच्या आई - वडिलांवर काय आभाळ कोसळेल ह्याची तुला कल्पना आहे... अरे त्या आई - वडिलांची सगळी स्वप्नच नष्ट होऊन जातील.. त्या मुलीचं आयुष्य उध्वस्त होऊन जाईल...”

काका हे एका स्वातंत्रसेनानी चे पुत्र होते. आणि आपल्या वडिलांची देश सेवा करण्याची जिद्द हि त्यांच्याहि अंगात होती. त्या मुलेच ते पुढे भारतीय सेनेत दाखल झाले आणि नुकतच त्यांना सहा महिने हि पूर्ण झाले न्हवते निवृत्त होऊन. त्यामुळेच त्यांना आतला भारत हा कसा बदललाय ह्याची पूर्ण माहिती झालेली न्हवती. आणि त्याक्षणी मला जाणवलं कि आपला भारतीय सैनिक हाच खर्या अर्थाने भारतीय आहे. ज्या मुलीशी आपला काहीही संबंध नाही त्या मुलीचं तिच्या वयाला न शोभणारं नुसतं संभाषण एकूण त्यांना एवढा त्रास होत होता.

मी काकांना शांत करत म्हणालो “ काका आधी तुम्ही शांत व्हा... अहो काका आता ते तिचं आयुष्य आहे..तिच्या आई - वडिलांची जबाबदारी आहे कि त्यांच्या मुलीने कसं वागावं ते... “म्हणजे ?” “ गणू काका प्रक्टिकल व्हा. आज जो काही काळ तुम्ही आम्ही बघतोय त्याला कोणीच जबाबदार नाही...” हे ऐकताच काका संतापले आणि म्हणाले “कोणीच कसं जबाबदार नाही? अरे ह्या देशात मुलीना शिक्षण भेटत न्हवतं , ते मुलींना मिळावं ह्या साठी सावित्रीबाई फुले ह्यांनी काय कष्ट घेतलेत ते माहिती आहेत ना?... आणि जबाबदारीचच म्हणत असशील तर ह्या गोष्टीला जबाबदार हे माझ्या लेखी हे त्या मुलींचे आणि मुलांचे पालकच आहेत...” “पालक ? ते कसे काय काका ? आणि हे तुम्ही बोलताय ? हे वाक्य खरंतर मी म्हटलं पाहिजे होतं... आणि ते मी बोललो हि... पण तुम्ही?...” मध्येच मला टोकत “ होय मीच बोलतोय... आणि हेच सत्य आहे... हल्लीचे पालक हे पालक म्हणवून घ्याच्या लायकीचेच राहिले नाहीत...” मी आश्चर्यचकित होऊन “ काका ?” “ हो योग्य तेच बोलतोय मी, आज कालचे हे पालक एक मूल जन्माला घालतात आणि त्याचे लाड हे अश्या रीतीने करतात जणू काही दुसर्यांना मुलच होत नाहीत , हे ह्या जगातले पहिलेच पालक असल्यासारखे आपल्या मुलांचे लाड करतात...” मी माझं हसू आवरत “ अहो पालक बनणे हा आपल्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. मग त्याचा आणि ह्या गोष्टीचा काय संबंध काका ?” काका लगेच उत्तरले “ संबंध नाही म्हणजे, अरे ह्या पालक लोकांच्या अति लाडामुलेच हि मुलं बिघडत चालली आहेत. आता मुलांच्या बाबतीतच बघना, आज कालच्या मुलांचे कपडे काय काय कपडे असतात ... छी छी छी !!! अरे लाजा कश्या वाटत नाही ह्यांना असले कपडे घालताना आणि हे पालक लोक कशी काय परवानगी देतात असले कपडे घालायला...” गणू काका हे ह्या विषयात फार चिडलेले दिसत होते त्यामुळे त्यांना शांत करण्याचे प्रयत्न माझे सुरूच होते. “ काका पण ह्यालाच तर ट्रेंड म्हणतात ना.... आणि काका आज काळ ट्रेंडी असण्याचं जग आहे... आणि आज आपण इतके पुढे गेलो आहोत कि आता मागे वळून पाहणे नाही...” काका नम्रपणे मला समजावत “ हो गेलोय ना आपण पुढे आणि आपण माणसं म्हणून जर का जन्माला आलो असू तर आपण पुढेच जायला हवं...” काकाचं हे बोलनं ऐकून माझा विजय होत आहे असच वाटत होतं ,पण इतक्यात “ पण पुढे जातांना आपण आपल्या बरोबरीच्या लोकांना बरोबर घेऊन पुढे गेलो पाहिजे, नाकि आपल्या लहान मुलांना आपल्या बरोबर नेवून ...” “म्हणजे?” मला प्रश्न पडला होता. “ आता हेच बघना तू म्हणतोस तसं आजचं जग हे फास्ट जग आहे वगैरे. ठीक आहे मी मानतो, पण मग हि मुलगी जिच्या वरनं आपण हि सगळी चर्चा करतोय तिच्या बाबत काय? अरे आजून शाळेतनं बाहेरही पडली नाहीये , अजून जग पाहणं तर सोड , ते पाहण्याची सुरुवात सुधा झाली नाहीये आणि अश्या ह्या वयात त्या मुलीचा बॉयफ्रेंड असू शकतो ?” “ अहो पण काका..” “ नाही मनोज ह्या गोष्टीचं समर्थन करू नकोस, अरे तुमची पिढीच जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टींना, आज ग्लोबलायझेशनच्या जमान्यात तुम्ही हे विसरत चालला आहात कि, कितीही झालं तरी आपल्या शरीराला निसर्गाने काही महत्वाची अवयव दिली आहेत , तीचा उपयोग करण्यासाठी सुद्धा एक विशिस्त वय निसर्गाने दिलंय, आणि ह्या गोष्टींच मोल आज तुम्हा लोकांना कळत नाहीये ह्याचंच वाईट वाटतंय... अरे मनोज जागे व्हा ह्या झोपेतून आणि बघा तुम्ही कुठे येऊन पोहचला आहात ते... अरे परदेशी लोकांचे तुम्ही छोटे कपडे घेताय ,पण तेच परदेशी लोकांना आपली संस्कृती हि अधिक जवळची वाटतेय... पण तुम्ही लोक मात्र लाज लज्जा सोडून वागताय... अरे ज्या विदेशातून तुम्ही हि संस्कृती आयात केलीय ना, त्या विदेशी लोकांना पण आपली भाषा बोलाविशी वाटतेय हि मोठी गोष्टं आहे...” काकांना थांबवत “ काका ह्या गोष्टी आम्हालाही मान्य आहेत ना, आम्ही कुठे हि गोष्ट नाकारतोय... आणि त्या मुलीच म्हणत असाल तर काका ह्या देशात अभिव्यक्ती स्वतंत्र आहे, त्यामुळे ती मुलगी स्वतंत्र आहे तिचे निर्णय घ्याला , आणि तुम्ही म्हणताय तसं ह्यात आमच्या पिढीचा काही दोष नाहीये, कारण त्या मुलीला कोणी जबरदस्तीने प्रेम करायला लावलं नाही ना?” काका पुन्हा नम्रपणे “ हो नक्कीच हि गोष्ट मलाही मान्य आहे, मी काही रागावलेलो नाही. माझं फक्त एवढच म्हणणं आहे कि एवढ्या जलद गतीने पुढे जाताय, थोडं थांबा आणि विचार करा कि नेमकं कुठे चाललाय ते... माझी खात्री आहे उत्तर नक्कीच सापडेल...शेवटी एकाच सांगतो मनोज काळ बदलतोय आणि तो बदलणारच त्याला कोणीही थांबवू शकनार नाही... पण इथेच आपण विचार करायचं कि आपण कुठे जायचं ते.” एवढं बोलून काका आपल्या घराच्या दिशेने निघाले.

मी मात्र काकांच्या बोलण्याचा जरा खोल वर जाऊन विचार केला, आणि मग जाणवलं कि हो आपण खरोखरच चुकतोय. आपण काही गोष्टी नको त्या वयात इतक्या आत्मसाद केल्या आहेत कि त्या गोष्टी करण्यासाठी आपण त्या वयात यायची हि वाट बघत नाही आहोत , विशेषता हि नवीन पिढी. आणि म्हणून हि नवीन पिढीच जर का वाया जाऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपणच ह्या मुलांना ह्या गोष्टी करण्यापासून थांबवलं पाहिजे , पण तेही त्यांच्या वयाचं होऊन. आज आपण रस्त्यावरच्या अश्या जोडप्यांना निमूट पणे बघत जातो आणि दुसर्या दिवशी एखादी वाईट बातमी कानावर आली तर स्वताला सोडून इतर सगळ्या सिस्टमचा राग करायचा...

काकांच म्हणणं पटलं.. लगेच काकाच्या घरात गेलो आणि म्हणालो “ गणू काका मी तुमच्या बोलण्याचा विचार केला आणि मला खरच जाणवलं कि आपल्या आजू - बाजूला ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या कुठे तरी थांबायला हव्यात... आणि म्हणून मी आज शपथ घेतो काका, कि आज पासून जर का अश्या गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या तर मी शांत बसणार नाही, माझ्या परीने त्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न करीन...”

काकांनी माझ्या कडे बघितलं आणि फक्त “ यशःस्वी भव..” असा आशीर्वाद दिला...

आणि ,मी निघालो आपल्या काट्यावर, उशीर झालाय म्हणून शिव्या ऐकायची तयारी ठेवून....संदर्भ: मी मराठी माझी मराठी review team
लेखक :रोहित सुर्वे

http://dl.flipkart.com/dl/home-kitchen/large-appliances?affid=bhaveshpa

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita