३/२१/२०१५

आग्र्याहून सुटका


शिवरायांचा आठवावा प्रताप !वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल. चौक्यावर पहारेकऱ्यांना चकवायला खाली लपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मिठाया ठेवायला हव्यात. अशा पेटाऱ्यांना दोन भोयांनी ते कमीत कमी 7-8 किमी दूर नेताना लागणारा वेळ. भोयांना कटात सहभागी करून कितीवेळ हे निसटणे लपलेले राहणार, वगैरे कसे शक्य आहे याची चिकित्सा करायला हवी. त्यातील त्रुटी पाहता मिठाईच्या पेटाऱ्याची युक्ती फक्त कल्पना होऊ शकते असे लेखकाला वाटते.
लेखक, डॉ. अजित प. जोशी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तिदायक जीवनावर आजपर्यंत अनेक छोटे मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत. (त्यात) संशोधनात्मक लेखन खूप कमी आहे. आगऱ्याहून सुटका प्रसंगाची उपलब्ध ऐतिहासिक पत्रे, बखरी तसेच शिवाजी महाकाराजींची व्यक्तिरेखा लक्षात घेऊन एक नवी मांडणी प्रस्तूत ग्रंथात केली आहे. त्यामुळे त्याला काही प्रमाणात संशोधन प्रबंधाचे स्वरूप आले आहे. चिकित्सक वाचक तसेच इतिहासाचे अभ्यासक यांना हा ग्रंथ आवडेल असा विश्वास वाटतो.
‘नव्याने जुने शुद्ध करावे’ असा कौटिलिय अर्थशास्त्राच्या 25व्या ‘दुर्गनिवेश’ नावाच्या प्रकरणात उल्लेख आहे. दुर्गनिवेश म्हणजे किल्ल्याची मांडणी. उपलब्ध लेखन सामुग्रीवर आधारित नवीन विचार करून त्याचा नवीन अन्वयार्थ लावून प्रस्तूत ग्रंथात नवीन प्रमेय मांडले आहे.
सध्या मान्य असलेल्या मिठाईच्या पेटाऱ्याच्या कथेचे विश्लेषण केले आहे. पुरंदरच्या तहापासून शिवाजीराजे व संभाजीराजे राजगडावर परत येईपर्यंतचा कालखंड विस्तृत पुराव्यांसह सादर केला आहे. शिवाय नेताजी पालकरबद्दल उपलब्ध माहिती परिशिष्ठ 1 मधे दिलेली आहे.
नवीन प्रमेय - पेटाऱ्याची कथा आणि तिचा फोलपणा
बहुसंख्य इतिहासकारांचे मत शिवाजीमहाराज संभाजीसह औरंगजेबाच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटले असा आहे. याचे कारण बहुतेक सर्व ऐतिहासिक साधनांमधून राजे पेटाऱ्यातून निसटल्याचा उल्लेख आहे. या प्रमेयाच्या विरोधात दुसरे कोणतेच प्रमेय उपलब्ध नसल्यानेही पेटाऱ्याची कथाच जनमानसात मान्य आहे. पेटाऱ्याच्या कथेतील सोपेपणा, साधेपणा, नाट्य तसेच त्यातून दिसणारा मोगल अधिकाऱ्यांचा बावळटपणा यांच्यामुळे कथेस अधिक उठाव येत असल्याने ती सामान्य जनतेस मान्य झाली असावी.
या प्रमेयाला मारक 12 मुद्दे कसे विरोधी ठरता याचे विवेचन लेखनाने सविस्तर केले आहे. त्यातील एक मुद्दा जास्त बिनतोड वाटतो तो असा –
पेटाऱ्यात बसणाऱ्या माणसाला अगदी असहाय्यपणे पाय व अंग मुडपून बसावे लागते. अशा अवस्थेत खूप ताकदवाद व लवचिक देहाचा माणूस देखील फार काळ बसून राहू शकणार नाही. दोन-तीन कोस म्हणजे 5-7 मैल (8 ते 10 किमी) चालण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो. (असा प्रवास पेटाऱ्यांची कावड करून जाताना भोयांच्या चपळ पायगतीचे अंदाज बांधता, प्रत्येक चौकीवर थांबत थांबत 2 पेक्षा जास्त तास तरीही लागतील असे म्हणता येईल. - कंसातील विचार माझे)
अशा अवस्थेत बंदिस्त पेटाऱ्यात तलवारी सारखे शस्त्र जवळ बाळगता येत नाही. त्यामुळे पेटाऱ्यातील माणूस संरक्षणासाठी पूर्णपणे बाहेरील माणसांवर अवलंबून असतो. जर सापडले तर शिरच्छेद ठरलेलाच! इतक्या असहाय्य स्थितीत, संपूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून, अतिशय सावधपणे सुरक्षित योजना आखणारे शिवाजी महाराज नजरकैदेतून निसटण्याचा धोका पत्करतील असे वाटत नाही.
राजांच्या महालापासून ते रस्त्यापर्यंत 5-6 चौक्या पार करायला लागत होत्या. एवढ्या पहाऱ्यातून एकदाही तपासणी न होता एखादा पेटारा डेऱ्यातून बाहेर पडणे शक्य नाही. प्रत्येक पेटाऱ्याची किमान एकदा तपासणी होतच असणाऱ. संशयी औरंगजेबाचे हेर किंवा फौलादखानाचे सैनिक ते पेटारे कुठे, कोणाकडे जातात ते पाहण्यासाठी पाळतीवर असण्याची शक्यता आहे. धूर्त बादशाहाने राज्यांवर पहारा करणाऱ्या सैनिकांना पेटाऱ्याच्या कडक तपासणीचा हुकूम दिलेच असणार. म्हणून मिठाईचे पेटारे तपासणी न होताच राजांच्या डेऱ्याबाहेर पडणे अशक्य आहे. (आणखी एक मला सुचलेला विचार - राजांच्या स्थानबद्धतेत ही मिठाई त्यांच्याकडील स्वयंपाक्यांनी बनवलेली नसावी. ती बाहेरील गावातील नामांकित हलवायांच्या दुकानातून आत मागवली जात असेल. ज्या पेटारा किंवा बुट्ट्याच्या करंडीत वा पेटीत मिठाई आली त्याच पेटीतून ती परत मोठ-मोठ्या सरदार व मानकऱ्यांच्या घरी पोहोचवायला, देण्यास पाठवली जात असेल. मिठाई ही वस्तू ठिसूळ असल्याने त्याची पेटी वा पेटारा जर माणूस बसेल इतक्या मोठ्या आकाराचा व इतका भक्कम तरीही बाहेरून कोणी तलवार खुपसली तर आत आरपार जाईल पण मिठाई शाबूत राहील अशी असायला हवी. अशा करंडीवजा पेटीतून पलायन एक अति धोक्याचा प्रयत्न म्हणून अशक्य वाटतो)
काही इतिहासकरांच्या मते शिवाजीमहाराज पेटारे वाहून नेणाऱ्यांच्या वेषात व संभाजीराजे पेटाऱ्यात बसून डेऱ्याभोवतालच्या पहाऱ्यातून निसटले आसावेत. परंतु या प्रकारातही तेवढाच धोका संभवतो. एक वेळी 2-4 भोईच एक पेटारा घेऊन चौकाबाहेर पडू शकतात, पेटाऱ्यांप्रमाणे भोयांचीही कडक तपासणी होत असणार. त्यामुळे एखादा नवा भोई (जो आत आलाच नाही) पहारेकऱ्यांकडून ओळखला जाण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय सर्वात म्हत्वाचे म्हणजे शिवाजीमहाराजांचे राजबिंडे रूप आणि जरब! ते भोयाच्या वेशात लपून राहणे अशक्य आहे. (‘त्यांना पाहूनच हा माणूस राजाच असला पाहिजे असे वाटते’ असे वर्णन राजस्थानी पत्रात सापडते)
निसटण्याच्या तारीखेचा घोळ
दुसरे असे की शिवाजी महाराज आग्र्याहून कोणत्या दिवशी निसटले याबद्दल ऐतिहासिक कागदात एकमत नाही. मात्र 18 ऑगस्टच्या सकाळी ते दोघेही निसटल्याचे पहाऱ्यावरील सैनिकांच्या लक्षात आले. ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजीमहाराजांची दरबारातील भेट 12 मे 1666 व नंतरची सुटका 18 ऑगस्ट 1666 अशा तारखा पक्क्या आहेत.
सध्या मान्य असलेल्या घटनाक्रमानुसार औरंगजेब 18 ऑगस्ट रोजी आपणास दुसऱ्या हवेलीत नेऊन ठार मारणार अशी बातमी समजल्यामुळे शिवाजीमहाराज 17 ऑगस्ट रोजी घाईघाईने आग्र्यातील नजरकैदेतून निसटले, नंतर 25 सप्टेंबर 1666 रोजी सुमारे 25 दिवसात दक्षिणेत 700 मैलावर राजगडाला पोहोचले. शिवाय दक्षिणेत जाण्याआधी त्यांनी संभाजीला मथुरेला म्हणजे आग्ऱ्याच्या उत्तरेला 33 पोहोचवले. म्हणजे त्यांना तसे फक्त 22 -23 दिवसच मिळतात. आग्र्याहून घाईघाईने बाहेर पडण्यामुळे त्यासाठी लागणारे माणसांचे, घोड्यांचे आयोजन, करण्यासाठी राजांकडे वेळ नाही. आणि ते सर्व आयोजन महाराजांनी आधीच करून ठेवले होते असे मानले तर मग औरंगजेबाने मारण्याचा हुकूम काढण्याचा वाट बघत राजे आग्र्यात का थांबले असा प्रश्न निर्माण होतो!
पुर्व योजनेचा अभाव, घोड्यांचा वेग व क्षमता, पावसाळ्याचा ऋतु, या गोष्टी लक्षात घेतल्यास आग्रा ते राजगड अंतर घोड्यावरून 22-23 दिवसात पार करणे अशक्य वाटते. राजांनी राजगड ते आग्रा हा लवाजम्यासह जातानाचा प्रवास 5 मार्च ते 11 मे या काळात म्हणजे एकूण 66 दिवसात पुर्ण केला होता. मोजक्या माणसांना बरोबर घेऊन आग्रा ते राजगड हे अंतर (जास्तीत जास्त वेगाने) सुमारे 45 ते 50 दिवसात वेगाने कापणे शक्य आहे. असे लेखक मानतात. या बाबत लेखकाने भांबोरकर भोसल्यांची एकदा दस्तऐवजासाठी व जीव वाचवायसाठी केलेली (सुमारे 200 वर्षांच्या फरकाने घडलेली) घोडदौड सविस्तर निवेदली आहे. ‘त्यात घोड्याला तीव्र गती देऊन कोठेही न थांबता ते रात्रभर चालून (पळवून)18 कोस – 45 मैल – 72 किमी) ते सुरक्षित स्थळी पोहोचले होते असा उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर ते (व घोडा?) 3 अतिश्रमाने 3 दिवस जाग्यावर पडून होते.’ असे ही म्हटले आहे. ‘एका दिवसात इतकी दगदग केली की कसे थकायला होते याचे ते प्रतीक आहे. असे 22 - 23 दिवस सतत घोडदौड करणाऱ्या माणसाचे काय हाल होतील याची कल्पना देखील करणे अवघड आहे.’ असे लेखक म्हणतात.
मग अशी सर्वमान्य प्रमेये अमान्य होत असतील तर मग लेखकनी नवे प्रमेय ते काय मांडले?
याचा आढावा पुढील भाग 2 मधे ....
भाग 2
नव्या प्रमेयाप्रमाणे -
1. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली 22 जुलैलाच सोडली!
2. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून 15 दिवसाच्या प्रवासात 250 मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश 15 ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले. 16 ऑगस्टला निराजी रावजींनी तोवर शिवाजी महाराजांचा वेश उतरवला व हिरोजी फर्जंदास तो पोषाख व दागदागिने चढवले. निराजी रावजी आपल्या स्वतःच्या म्हणजे ब्राह्मण कारभाऱ्याच्या वेषात खोलीच्या बाहेर पडले. संभाजी राजे व प्रल्हाद निराजी (निराजींचा संभाजीराजेंच्या समवयस्क मुलगा) दोघेही 15 ऑगस्ट रोजी रामसिंहाकडे त्याच्या हवेलीत राहण्यास गेले होते. संभाजीराजे तसे आधीपासून हवेली बाहेर पडून जात असत. कारण त्यांच्यावर कैद नव्हती. नजरेत असावेत असा संकेत होता.
3. त्यांच्याबरोबर रघुनाथपंत कोरडे, व्यंकटपंत डबीर, राघो मित्र मराठा, दत्ताजी त्र्यंबक असे तीर्थयात्रेसाठी चाललेले ब्राह्मण व त्यांची दोन मुले असे पुर्वी तयार करवून घेतलेले दस्तक होते. हिरोजी फर्जंदचे ‘राजांचे रूप’ किती काळ यशस्वीपणे पार करेल याची शंका होती म्हणून हिरोजी ‘राजांना’ मदत करायला रघुनाथपंत व त्र्यंबकपंत 17 ऑगस्टला मथुरेतून परत 18 ऑगस्टला आग्र्याला आले. नंतर संभाजी राजे वाराणसीकडे रवाना झाले. नंतर ते अलाहाबाद, गोंडवन, मंगलगढ, देवगढ मार्गे 20 नोव्हेंबर 1666 रोजी स्वराज्यात राजगडावर इतरांसह पोहोचले...
4. बातमी फुटली - इकडे हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आग्र्यातील हवेलीतून निघून गेल्याने ती रिकामी झाली. रिकाम्या हवेली भोवती फौलादखानाची व रामसिंहाची माणसे पहारा देत राहिली. 18 ऑगस्टला बातमी फुटली... त्या दिवशीच्या अखबारात मधील मजकूर सांगतो, ‘सीवा पळून गेला...’ फौलादखान, ज्याच्यावर सीवाच्या नजरकैदेची पूर्ण जबाबदारी होती तो, आपल्या अर्जात म्हणतो, ‘मलाही कळेल नाही. त्याच्या पलायनाचे रहस्य... एक बांधलेली पगडी, आरसा व जोडे पडलेले आहेत.’... ‘कुमार रामसिंह घुसल खान्यात बसलाय ...’ त्याला हुकूम आला. ‘तू सीवाचा जामीन आहेस. तू त्यास हजर केले पाहिजेस...’ शिवाजी महाराजांच्या डेऱ्यात अधूनमधून येणाऱ्या कवी कलश - कवीश्र्वर व सक्सेना कायस्थ यांना साखळदंडात अडकवण्यात आले. नंतर एक दोन दिवसांनी काही विचार केल्यावर मोगल सरदारांनी असा निष्कर्ष काढला की ‘शिवाजी पेटाऱ्यातून पळाला. हे पेटारे काठ्यांना लटकवून आतबाहेर येत जात असत. ..’19 ऑगस्टला हसन अलीच्या हेरांनी बातमी दिली ... ‘शिवाजीराजांचे वकील राघो पंडित, त्र्यंबक पंडित व दोन नोकर सापडले. ते हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर असावेत...’ बळीराम पुरोहित, जीवा जोशी, श्री किशन, हरिकिशन असे चौघे रामसिंहाचे लोक पहाऱ्यावर होते. त्यांना चाबकांचे फटके व नाकात मीठ भरायची धमकी देऊन सत्य उगलायचा प्रयत्न झाला. ‘आम्ही त्याला एक घडीच्या आधी असताना पाहिले... सकाळी त्यांने सुका मेवा मागितला आणि खाल्ला. अशी जबानी त्यांनी दिली...’
5. औरंगजेब ऱघुनाथ पंत व व्यंकटपंत हे मोगलांच्या दरबारी शिवाजी महाराजांचे वकील म्हणून दहावर्षापासून माहिती होते म्हणून त्यांच्या शब्दाला ग्राह्य मानून फौलादखान वाचला पण रामसिंहाची मनसब बडतर्फ केली गेली...
6. 19 ऑगस्टला बादशहाने नेताजीला पकडण्याचे आदेश जयसिंगाला दिले.
7. इकडे परतताना चांदवड (जि. नाशिक) ला शिवाजी महाराजांचा मनोहरगडावर मुक्काम होता. त्या आधी नरवरच्या घाटीत नाट्य रंगले. पुर्वी ठरवल्या प्रमाणे शिवाजीमहाराजांची माणसे छोट्या छोट्या तुकड्या करून चौकी किवा ठाणे संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी ओलांडत. काही तुकड्या शिवाजीरायांच्या मागे तर काही पुढे. नरवरची चौकी औलांडताना चौकीवरील पहारा देणाऱ्या शिपायांनी सर्वांचे दस्तक पाहिले. सर्वांनी आम्ही शिवाजीची माणसे आहोत असे सांगितले. शिपायांनी दस्तक पाहून परत केले व पुढे जाण्याची खूण केली. पुढे जाताना वेषांतर केलेल्या शिवाजीराजांनी खोचकपणे म्हटले, ‘आम्ही शिवाजीच आहोत.’ चौकीवरील शिपायांना राजांच्या या बोलण्याचा अर्थ नीट समजला नाही. पण नरवरच्या फौजदाराला पाठवायच्या बातमीपत्रात यासर्व घटनेची नोंद केली.
8. शिवाजी महाराज सिरोंज – हांडिया इथे नर्मदा ओलांडून – पुढे चारवा – छानेरा – असीरगढ करत बऱ्हाणपुरकडे निघाले. नंतर ते बहुधा जळगाव - एरंडोल - मालेगाव करत चांदवडला साधारण 5 सप्टेंबरला मराठी सरदाराच्या वेषात आले असावेत.
9. मनोहरगड उर्फ कौलदेहेर येथे हे गुप्त निवासस्थान निवडले. (मुंबई-आग्रा महामार्गावर राजदेहेर, इंद्राई तसेच चांदवड किल्ले जवळून दिसतात. परंतु, कौलदेहेर उर्फ मनोहरगड हा जरा लांब डोंगरात लपला आहे!)
10. शिवाजी महाराज मनोहरगडावर पोहोचल्यानंतर 10-15 दिवसांनी सुमारे 20 सप्टेंबरला शिवाजीराजांचे सैन्य नाशिक-त्र्यंबक प्रांतात शक्यतो कोणास समजून न देता जमू लागले. सुमारे 5000 घोडदळ जमा झाले. सुरतेवर हल्ला करायची अफवा त्यामुळे निर्माण झाल्याची न्यूज डच पत्रातून पसरली होती.
11. निराजी रावजी ज्यांनी 22 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंत आग्र्याच्या हवेलीत शिवाजींचे रूप घेतले होते ते व अन्य मंडळी 17 ऑगस्टला मथुरेहून निघाली. सुमारे 900 मैलाचा प्रवास करून 20 ऑक्टोबरला चांदवडला व पुढे कौलदेहेर उर्फ मनोहरगडावर गुप्तपणे गेले. तेथे त्या सर्वांची शिवाजीमहाराजांबरोबर भेट झाली.
12. राजे 1 नोव्हेंबर तर संभाजीराजे 20 नोव्हेंबरच्या सुमारास राजगडावर पोहोचले. अशा रीतीने राजांची माणसे स्वराज्यात परतली. मात्र नेताजी पालकर व त्याचे नातेवाईक सुमारे दहा वर्षे मोगलांकडेच अडकले.

नवीन प्रमेया प्रमाणे शिवाजीमहाराज निसटले कसे ? ते पुढील भाग 3 मधे...

भाग 3
शिवाजीमहाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे
नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून 1666च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते.
1. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्या अभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती.
2. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता. त्यामुळे राजे रामसिंहाला दिलेल्या वचनातून मुक्त झाले होते.
3. दर गुरूवारी व्रतानिमित्त उत्सव करून राजांच्या निवासस्थानाजवळ गर्दी जमवण्यास सुरवात झाली होती. त्या गर्दीची पहारेकऱ्यांनी सवय झाली होती.
4. मिठाई वाटण्याच्या निमित्ताने तसेच इतर मार्गांनी राजांनी वजीर व इतर उमरावांशी मैत्री वाढवली होती. राजे उमरावांशी मैत्री करीत असल्याचा उल्लेख 13 जुलै 1666च्या राजस्थानी पत्रात परकळदासाने केला आहे.
5. आता आपण दिल्लीतच राहणार असा विश्वास राजांनी मोगल पहारेकऱी, उमराव तसेच औरंगजेब यांच्यात निर्माण केला होता. त्यामुळे यासर्वांमधे थोड्याफार प्रमाणात गाफीलपणा आला होता. तो आणखी अंगवळणी पडणे आवश्यक होते.
6. 16 जूनच्या (फकीर होण्याच्या) अर्जानंतर राजांनी कोणताच अर्ज औरंगजेबाकडे केला नाही. एकदम 13 जुलैचे पत्र सापडते. त्यामधेही राजांचे प्रकरण जैसे थे असल्याचा उल्लेख आढळतो.
7. तोवर शिवाजीराजांच्या एकूण सुमारे 350-400 जणांच्या लवाजम्यापैकी बहुतेक सर्वांचे परवाने किंवा दस्तक मिळवण्यात आले होते. काही बनावटही होते. दस्तकावर लष्करप्रमुख या नात्याने मीर बक्षी मुहंमद अमीनखानचा शिक्का होता. याला राजेंनी आधीच वश करून घेतला होता. त्यांमुळे मोठ्याप्रमाणात बनावट दस्तक करायला सहज शक्य झाले.
8. नजरकैदेत कधी कधी रामसिंहाच्या मुलाबरोबर खेळायला संभाजी राजेंचे येणे-जाणे चालू असे. स्वतः शिवाजी महाराज कधीकधी रामसिंहाकडे जात असत. राजांनी डेऱ्याबाहेर पडू नये असा हुकूम असूनही मोगल पहारेकऱ्यांनी आक्षेप घेतला नव्हता. बहुधा अशा वेळी राजांबरोबर पहाऱ्यावरील काही शिपाई राजांबरोबर जात असावेत.
9. साधारण 15 जुलैला रामसिंहाशी भेटीत असे कळले की औरंगजेब 3 दिवसासाठी शिकारीला जाणार आहे. रामसिंहाच्या विचारणेला की ‘तुम्ही येणार असाल तर तुम्हालाही बरोबर घेऊन चलतो’ यावर महाराजांनी ‘बादशाह माझे प्रकरण केंव्हा निकालात काढणार? बादशाहांना अर्ज करा की आमचे प्रकरण निकालात काढा, नाहीतर मी असाच इथे मरून जाईन! आणि बादशहांच्या हातात माझे गडही मिळणार नाहीत.’ शिवाजीराजे व रामसिंहाचे हे संभाषण इंग्रजी भाषांतरात यदुनाथ सरकारांनी वगळले आहे!
10. राजांचा डाव – शिवाजीमहाराजांसारखा दिसणारा दुसरा माणूस राजांच्या जागेवर ठेवणे, संभाजी राजांना डेऱ्यातच ठेवणे, राजे निसटल्याची बातमी जास्तीजास्त काळपर्यंत गुप्त ठेवणे.
11. निराजी रावजी यांची निवड ‘कैदेतील सिवा’ म्हणून केली असे दिसते. निराजी रावजी वयाने महाराजांच्या 40-45 वयाचे होते, त्यांचा 14 -15 वर्षाचा मुलगा प्रल्हाद, संभाजीराजांच्या पेक्षा जरा मोठा पण बरोबरीचा होता. ते अत्यंत चौकस, बुद्धिमान, अनेक भाषा जाणणारे, न्यायनीती तज्ञ (नंतरच्या काळातील स्वराज्याचे न्यायाधीश होते) आग्रा शहरात ते राजांचे वकील होते. या प्रकरणातील गुंतागुंत त्यांना माहिती होती.
12. आज उपलब्ध असलेल्या पत्रात कुठेही निराजी रावजी याने शिवाजी महाराजांची जागा घेतल्याचा उल्लेख नाही! परंतु हिरोजी फर्जंद हा फक्त एक ते दीड दिवसच राजांच्या रूपात असल्याचा स्पष्ट उल्लेख बखरीत सापडतो.
13. दुसऱ्या कोणा व्यक्तीकडे बोट दाखवणारे पुरावे उपलब्ध झाल्यास निराजी रावजी ऐवजी ती दुसरी व्यक्ती राजांच्यारूपात राहिली असे अनुमान करता येणे शक्य आहे. परंतु आजच्या विश्लेषणातून निराजींचे नावच पुढे येते.
14. हिरोजी फर्जंद हा रांगडा शिपाईगडी. मुत्सुद्देगिरी, कुटीलनीती हा त्याचा प्रांत नव्हे. दीर्घकालील अनिश्चित अशा योजनेसाठी हिरोजी फर्जंद उपयोगाचा नव्हता. एखादा पेचप्रसंग आल्यास गोंधळून जाऊन बेत फिसकटला जाण्याची शक्यता हिरोजी फर्जंद याच्या बाबतीत खूपच अधिक होती.
15. कवींद्र परमानंद - सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावचा रहिवासी होता. त्याला कवींन्द्र कवीश्वर ही पदवी मिळाल्यावर ‘परमानंद’ हे नाव धारण केले होते... पुढे शिवाजीराजांनी कवींद्र परमनंदांच्या कुटुंबाला मलकापूर व कोल्हापूर जवळील गावे इमान दिली होती. परमानंद पोलादपुरात विद्यार्थ्यांना शिकवीत असत.
16. सन 1673 च्या सुमारास शिवाजीराजे पोलदपूरला कवींन्द्र परमानंदांना भेटले असे दिसते. यावरून राजे कवींद्रांना खूप मान देत होते असे दिसते. आग्र्याहून सुटकेची घटना या पुर्वीची असल्याने कवींद्र परमानंदाने आग्र्यातून निसटण्यासाठी शिवाजीराजांना मदत केली असावी असा निष्कर्ष काढता येतो.
17. एक विद्वान मराठी पंजित म्हणून कवींद्र परमानंदाला शिवाजीराजे पुर्वीपासून म्हणजे 1664 पासून ओळखत होते. राजगडाकडून आग्र्याकडे जाताना राजांनी मथुरा व इतर क्षेत्रातील काही ब्राह्मणांना पत्रे पाठवली.तसेच एक पत्र राजांनी कवींद्रांना पाठवले अलसावे. त्यापत्रानुसार शिवाजीमहाराझांच्या निमंकत्रणावरून कवींद्र परमानंद राजांना भेटण्यासाठी काशीहून आग्रा येथे आले. त्याच्या बरोबर इतरही पंजित असण्याची शक्यता आहे.
18. पुर्वीपासून ओळख असलेला विद्वान, काशीस्थ मराठी ब्राह्मण शिवाजी महाराजांनी आपल्या सुटकेसाठी रचलेल्या डावात सामील करून घेतला.
19. औरंगजेबबादशहा तीन दिवसाच्या शिकारीसाठी जामार हे शिवाजीमहाराजांना दहा दिवस आधीच समजले होते. दर गुरूवारी व्रतानिमित्त मिठआईवाटायला कार्यक्रम आता पहारेकऱ्यांच्या अंगवळणी पडला होता. अशा वेळी एकाद्या समारंभाच्या गर्दीतून निसटण्यचा राजांनी बेत आखला.
20. कवींद्र परमानंद नेवासकर आग्र्यात महाराजांच्या डेऱ्यातच राहात होता. राजांनी त्याचा सत्कार व मोठे दान करायचे ठरवले. दान समारंभाचे मोठे वर्णन राजस्थानी पत्रात आढळते पण मराठी बखरीत ओझरता उल्लेख ही सापडत नाही.
21. शिवाजीमहाराजांनी कवींद्र परनानंदांची यथोचित पुजा केली व एक हत्ती , हत्तीण, एक घोडा, सरोपा (शिर से – पाव तक पोषाख) व एक हजार दान केले. शिवाय वर एक हत्ती देण्याचे वचन दिले. ‘आता मी आपले ह्ती-घोडे देऊन टाकीन व फकिरासारखा बसून राहीन’ असे ते त्या दानाच्या वेळी म्हणाले. महाराजांचे हे शब्द म्हणजे दिशाभूल करणारा सापळा आहे. मंदगतीचे गज दीर्घ प्रवासाला कुचकामी पण दानाच्या दृष्टीने महान. पण घोडा व हजार रुपये दान देऊन बाहेर एका वाहनाची व पैशाची तयारी करता आली हे महत्वाचे.
22. महाराजींनी कवींद्र परमानंदांना चाळीस चाकर दिले होते असे राजस्थानी पत्रांवरून दिसते. या चाळीस नोकरांमुळे डेऱ्याबाहेर जाणाऱ्यांची गर्दी वाढली.पहाऱ्यावर असलेली रामसिंहाची माणसे, औरंगजेबाचे हेर, फौलादखानाचे शिपाई तसेच बादशाहाचे खास सैनिक हे सारे हा हत्ती-घोडे-दान–समारंभ काही अदभूत पहावे अशा नजरेने पहात होते. एक श्रीमंत राजा एका पंडितास एवढी मोठी दाने शास्त्रोक्त समारंभपुर्वक देत असल्याचे दृष्य त्या मोगलांच्या चाकरांनी उभ्या आयुष्यात पाहिले नव्हते! त्यामुळे भारावून गेल्याप्रमाणे सर्वांचे लक्ष समारंभावर केंद्रित झाले होते. म्हणूनच परकळदासाला त्याचे वर्णन पत्रात करावेसे वाटले. दानानंतर सर्वांना भोजन दिले गेले. पहारेकरी व इतरांना पोटभर मिष्टांन्ने दिली गेली. त्यामुळे अर्थात पहारा ढिला पडला.
23. शिवाजी महाराज यावेळी काय करीत होते निराजी रावजी याच्याबरोबर राजे आपल्या महालात गेले. तेथे आपल्या डोक्यावरील केस साफ कापून काढले.दाढीही काढून टाकली. फक्त भरदार मिशा व डोक्याला एक शेंडी ठेवली राजांनी ब्राह्मणांचे कपडे घालून डोक्यावर पगडी चढवली. ब्रह्मण वेषात शिवाजीराजे कवींद्र परमानंदांच् जथ्थ्यातील ब्रह्मणात मिसळून गेले. त्यांच्यभोवती त्चे विसश्वासून कारभारी होतेच.
24. इकडे निराजी रावजी शिवाजी राजांचा वेष व दागिने चढवून राजांच्या पलंगावर स्वस्थ निजले! ‘तोतयाने’ शिवाजीमहाराजांची जागा घेतली! कवींद्र परमानंदांसह सर्व प्रमुख ब्राह्मणांती जेवणे उरकली होती. त्यांच्या साठी पासख्या तयार होत्या .आपापल्या पलख्यात बसले. एका पालखीत ब्राह्णणवेष धारी महाराज बसले. राजांबरोबरच त्यांचे कारभारी रघुनाथ पंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर,इत्यदिमातब्बर मंडळी पालखीत तून तर तानाजी मासुसरे, येसाझी कंकं, इत्यादि जिवासजीव देणारी मंडळी घोझढ्यावरून निघाली.
25. कवींद्र परमानंदांना मिलालेले हत्ती घोडा चाळीस चाकर यांच्यासह प्रचंड लवाजमा हवेलीच्यापरिसरातून बाहेर पडला. यासर्वांचे परवाने तयारच होते. ब्राह्मणवे,तील शिवाजीमहाराजांचा बनावटनावाचा दस्तकही तयार होता. परंतु, मिष्टान्न काऊन सुस्तावलेल्या पहारेकऱ्यांनी दस्तक काटेकोरपणे न तपासताच या मोछठ्या लवाजम्याला बाहेर जा ऊ दिले. चाळीस चाकरांमुलेव पहायला जमलेल्या लोकांमुळे मोगलांचे राजांकडे आणखी दर्लक्ष झाले. आशी रीतीने आग्रा शहरातील नजरकैदेतून पोलादी पिंजऱ्यातून महाराज सहीसलामत निसटले. राजांच्या सुटकेचा एक महत्वाचा टप्पा पुर्ण झाला.
26. दुपारनंतर निघालेला हा 60 -70 माणसांचा जथ्था सूर्यास्ताच्या सुमारास फतेपूर – सीक्री व आग्रा याच्या मधील 12-15 मैल दूरच्या एका गावात पोहोचला. मुक्कामासाठी तंबू ठोकले गेले. कवींद्र परमानंदांना निरोप द्यायला आलेली करभआरी मंडळी परत आग्राअयाला निघाली. यवर लक्ष ठएवायला आलेल्या हेरांना चकवून शिवाजीराजेही पासखी सोडून घोढ्यावरून परत फिरले. राजांची रिकाम पालखी जथ्अतयात सोडली गेली. तानाजी मालुसरे, येसाजी कंक वगैरे राजांचे शइलेदार आग्राशहराला वळसा घालून धोलपुर कडे वळले.
27. वेगवेगळ्यावाटांनी पुढ जाण्याआधी शिवाजीमहाराजांनी पुढील योजना आपले कारभारी रघुनाथ पंत कोरडे व व्यंकट डबीरांना नीट समजीवूनसांगितली. संबाजीला आग्रऱ्यातून केंव्हा बाहेर काजाढायचे कुटे पोहोचवायचे काही गहन प्रश्न निर्माण झाल्यास कीय उत्तरे द्यायची, हे ठरले. संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी गुप्त पद्धती परवलीचे शब्द आदि गोष्टी ठरल्या! तिकडे परमानंदांनी कोठे जायचे, केमव्हा काय करायचे याच्या बारीक सारीक सूचना महाराजांनी आधीच दिल्या होत्या!
28. इतके आग्रा आघाडीत शांतता होती. शाही दरबार काही दिवस बंद असल्याने सुट्टीचे वातावऱण होते. औरंगजेब शिकारीहून परतयेईपर्यंत निराजींचा जम बसला. राजांचे कारभारी, प्रल्हाद निराजी व संबाजीराजे याच्या दिनक्रमात काहीच बदल नव्हता. जैसे थे असल्याने पहाऱ्यावरच्यारामसिंहाच्यामाणसांना, फौलादखानाच्या शिपायांना औरंगजेबाच्या हेरांना, अगदी वरच्या दर्जाच्या हसन अली हेराला देखील कसलाही संशय आला नाही!
29. शिवाजीमहाराजांनी पुर्वीच घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे निराजी रावजी ‘राजे’ बहुतेक वेळ खोलीत असत. बादशाहाने राजांना मनसबदारांना भेटण्याची बंदी केली होती. पहाऱ्यचे शिपाई पहारा बदलताना ठराविक वेळी राजांच्यामहालात डोकावून पहात तेमव्हा त्यांना राजे भिंतीकडे तोंड करून पलंगावर पहुडलेले दिसत. निराजी रावजी राजे पहाटे सूर्योदयापुर्वी किमवा संध्याकाळी म्हणजे उजेड कमी असताना डक्यावरून चादर किंवा साल लपेटून बाहेर बागेमधेमोकळ्य हवेत फेर फटका मारीत असत. त्यामुळे राजांचे गुपित फुटण्याची शक्यता खूपच कमी होती.
30. शिवाजीमहाराजांच्या सुटकेच्याप्रसंगाच्या या नव्यामाडणीवरून असे दिसते की महाराज 17 ऑगस्टच्या सुमारे एक महिना आधीच म्हणजे 22जुलैला आग्रा शहरातून निघून गेले होते. यासा काही अप्रत्यक्ष पुरावा सापडतो. 22 जुलै ते 18 ऑगस्ट यामधील कालातील राजांच्या हालतचाली , अर्जांची अनुपस्थिती जाणवते उठून दिसते. मराठी बखरींमदे कालविपर्यास मोठ्याप्रमाणात केला आहे. असे लेखकाचे म्हणणे आहे. फक्त 91 कलमी बखरीत (कलम 55) ...असा नित्य खुशाली अस्ज शिमा जाली.असे दोन मास होतां कोणे एके दिवशीच घटकादिवस असता उभयता पिता पुत्र डोलीत बसोन दिलेली बाहेर कुंबार राहात होत त्यच कडे गेले...यातील असे दोन मास होता उल्लेख महत्वाचा आहे.
वरील पुस्तकाची ‘सप्रेम भेट’ प्रत पु. ना. ओकांना लेखकाने 28 जुलै 1997ला दिली होती ती मी वाचायला मिळवली. तोवर पुस्तकाचे मुखपृष्ठ उपलब्ध नव्हते. या नव्या प्रमेयावर मान्यवर इतिहासकारांचे काय म्हणणे आहे, ते मला ज्ञात नाही. ते कोणास उपलब्ध झाल्यास सादर करावे. मला वरील प्रमेय अन्य मान्यताप्राप्त मतांपेक्षा जास्त सयुक्तिक वाटते.
भाग 4
समापन
या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल.त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो.
लेखक इतिहास शब्दाची व्याख्या (पान 9), इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात मार्गदर्शक तत्वे 1. कोणताही पुर्वाग्रह नको. 2. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये. 3. काही माहिती अनुपलब्ध असेल तर ते स्पष्ट करावे. 4. अस्सल माहितीवरून काही सिद्धांत काढायचा असेल तर काढावा. 5. उपमान प्रमाणावर कोणताही सिद्धांत ठरवू नये. वगैरे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगता.
साधनचिकित्सा – साधनांचे दोन वर्ग अस्सल कागद आणि बखरींसारखे चरित्रात्मक ग्रंथ. औरंगजेबाच्या दरबारातील कामकाजाची दररोजची नोंदींना ‘अखबार’ म्हणतात. मिर्झाराजे जयसिंह आणि रामसिंह यांच्यातील पत्रव्यवहार ‘राजस्थानी व फारसीतून’ आहे.
रस्ते व सराया
शिवाजीराजे आग्र्याला जात असतानाच्या वर्णनात लेखकानी रस्ते बैलगाडी जाता येईल इतके रुंद असल्याचे नमूद केले आहेत. प्रवाशाच्या सोईसाठी शेरशाहने दर 2 कोसावर सराया बांधल्या. अशा 1700 सरायांचा उल्लेख आढळतो. प्रत्येक सराईत पाण्याचे कुंड, जेवण व झोपायची सोय, तसेच घोड्यांना दाणा-पाणी याची सोय असे. प्रवाशाच्या पदा, श्रेष्ठतेप्रमाणे सोय उपलब्ध असे. नंतरच्या काळात या सरायांभोवती गावे वसली. या सराया डाकचौकी म्हणून ही वापरल्या जात.
बातमीदार व संदेशवाहक
मोगल राज्यात 4 प्रकारचे बातमीदार असत. 1. वाकेनवीस 2. सवाहनिगार. 3. खूफिया नवीस. 4. हरकारा. पहिले दोन सैन्यात व परगण्यात विखुरलेले असायचे. हरकारा म्हणजे तोंडी निरोप्या किंवा कधी कधी लखोटे नेणारा. आजच्या भाषेतील अंगडिया, कुरीयरवाला तर खूफियानवीस म्हणजे गुप्त हेर. बातमीपत्रे नळ्यातून पाठवली जात. चंगेजखानाच्या सैन्यात मोहिमेवर निघताना अधिकृत बातमीदार जासूदांची दोन रिंगणे सैन्याभोवती असत. पुढील परदेशाची मोहिमेच्यासाठी उपयुक्त माहिती ते सतत पुरवत असत. नदी-नाले, व्यापार-उदीमाच्या जागा, छावण्यांच्या जागा, हातघाईसाठी, लढाईचे मैदान वा जागांची निवड हे काम असे. जासूदाकडे राजमुद्रा असलेला बाण असे त्यातील आदेश राजाज्ञा मानल्या जात.
लेखकाने आग्रा ते बऱ्हाणपुर 520 मैलाचे गणित घालून नोंदींचा पाठपुरावा नकाशे व अन्य साधनांनी केला आहे यावरून त्यांच्या चिकाटीचा व सखोल शोधाचा माग लागतो.
नेताजी पालकर यांवर सखोल माहितीचे परिशिष्ठ 1 वाचनीय आहे.
पुरंदरचा तह झाल्यावर पन्हाळ्याच्या मोहिमेत अपयश आल्याचे निमित्त होऊन नेताजी पालकर विजापुरच्या अदिलशहाकडे चाकरीला गेला. नंतर शिवाजीमहाराज आग्र्याला 5 मार्च 1666 रवाना झाल्यानंर लगेच 15 दिवसात तो मोगलांना येऊन मिळाला. शिवाजीराजे निसटल्यावर नेताजीला बीड मधून पकडून दिल्लीला रवाना करण्यात आले. नंतर धर्म परिवर्तन करून त्याला अफगाणिस्तानच्या मोहिमेत पाठवले असताना त्याने निसटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर त्याची दिलेरखानावरोबर दक्षिणेत नेमणूक झाली असताना 1676 साली त्यानी पुन्हा महाराजांकडे गमन केले.
पुढील संशोधनाच्या दिशा परिशिष्ठात लेखकाने इतिहासाच्या अशा अनेक बाबींवर काम व्हावे असे सुचवून ग्रंथ पुरा केला आहे.लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन,188-2 शनिवार पेठ, पुणे.
पाने - 276. किंमत रु. 300
सध्या तेथे ते राहात नाहीत. न त्यांचा सध्याचा पत्ता इ.सं.मं.मधे चौकशी करून उपलब्ध होऊ शकला नाही. कोणाला माहित असल्यास जरूर कळवावा. ही विनंती.
समाप्त
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
शशिकांत ओक
shashioak@gmail.com
लेखक :डॉ अजित प. जोशी


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search