जगणे आहे सुंदर ते गाणे वेड्या,
हवा आहे बदल, फक्त थोडा बदल !
जीवन झोका त्या सुख दु:खाचा
नात्यामधल्या रुसव्याफुगव्यांचा
क्षणभंगुर भडक त्या भावनापायी
देतोस का असा आनंदास बगल ?
हवा आहे बदल,फक्त थोडा बदल !
समजुन घे समोरचे वास्तविक तू
शोध रे माणसातले फक्त गुण तू
सोडून अहंगंड तो संवाद साधता
आयुष्यात बघ कसे घडते नवल?
हवा आहे बदल,फक्त थोडा बदल !
शब्द कोमलअन वाणीत ओलावा
मनी नसावा कुठलाही तो कावा
शत्रूसही जातो मग प्रेमाचा सांगावा
सूड भावनाही ती मग होते विफल!
हवा आहे बदल, फक्त थोडा बदल !
माणुस हरेक असतो इथे वेगवेगळा
व्यक्ती व्यक्ती मुळ स्वभाव आगळा
कुणी आचरट तर कोण भासे भोळा
समजुन सारे कर रे जीवन सफल!
हवा आहे बदल, फक्त थोडा बदल !
आयुष्य आहे आपले अगदी थोडे
कशास हवेत हे अहंकाराचे घोडे?
दिवस आजचा फक्त आपल्या हाती
बघ अनुभवून इथले आनंद सकल!
हवा आहे बदल, फक्त थोडा बदल !


संदर्भ: anonymous

लेखक : प्रल्हाद दुधाळ.
www.dudhalpralhad.blogspot.com
9423012020

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita