३/१६/२०१५

बाप


" आज आहे रिसेप्शन
बायको सोबत गेटवर ऊभा आहे
मित्रा,माझ्या छकुलीच लग्न आहे


पहाता पहाता बघ ना कीती मोठी झाली
हात धरुन राजकुमाराचा 
ठमीबाई सासरी नीघाली

दारू सिगारेट सोड...
बायकोच नाही ऐकलं
पप्पा एक सीप घेऊ का?
विचारताच क्षणात सारं सुटलं

सर्टीफीकेट्स अन मेडल्स
नाचवत सोनुली घरी यायची
काय सांगु मित्रा, गर्वाने मान ताठ व्हायची

उशीर का होतो रोजरोज
बायको अंगावर ओरडली
साट्कन मित्रा तीच्या कानाखाली
मारली
आता मी उशीरा येतच नाही
मित्रा,चिऊराणी माझ्या शिवाय 
जेवतच नाही

नटलेल्या बायकोच्या पाणावलेल्या
डोळ्यांना सारं काही कळतं
अहो..! सोनुबाई शिवाय 
कसं होणार तुमचं...
विचारताच् अश्रु गाली ओघळतं

'आयुष्यभर मोडलो
कधी वाकलो नाही'
नमस्कार करत आज 
मी वाकत आहे...
मित्रा, आज माझ्या मुलीचं लग्न आहे
आज माझ्या छकुलीचं लग्न आहे.


संदर्भ:Facebook share
लेखक : anonymous
Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search