३/०१/२०१५

आला पाऊस आला...सकाळपासुन आज बर्याच वेळा पावसाच्या रापाट्या येत आहेत,मोठा नसला तरी भिजपाऊस चांगला आहे,पण आज सुरवात केली म्हणजे मोठा पाऊस येईल असा अंदाज आहे,
त्यातच आज मी संदिप खरे यांची कविता वाचली,अप्रतिम अशी पावसाची कविता
पाऊसराव....!

उशिरा बद्दल सॉरी-बीरी म्हणणे जरा राहूनच गेले, 
पाऊसराव आले ते ऐटीतच आले


ढग रंगाची फेल्ट-हैट, अंगात तोच हिरवागार सूट
म्हणाले कसला दुष्काळ-बिश्काळ, गर्मी-बिरमी सारे झूट...

झोकात चालले, गड़गड़ हसले डोळ्यात वीजा एकशे सत्तर
आणि हिरव्या हिरव्या सूटामध्ये म्रुदगंधाचे उंची अत्तर

पाऊसराव आले आणि ऑफिस सारे हलून गेले
हाताखालच्या मंडळींना तड़का फड़की हुकुम गेले 
वाऱ्यास म्हंटले आधी दरी पहिले सगळी झाडून घे
कामास लागा, फांद्या-फांद्यावरच्या पाना-पानास खबर दे 
ढगांनी झाड़ू मारून सगळे उन साफ केले आणि धूपा सारखे दरीमध्ये धुके धुके पसरून गेले
धबधब्यांना आदेश गेले, मारा उड्या चालू व्ह्या
ढग घेतो आहे झाडून तुम्ही मागुन पुसून घ्या
धरती खालच्या निजल्या बीजास थेम्ब थेम्ब टप्पल मारून
म्हंटले सोडा आळस आता वरती यायचे फूली फुलून

पाऊसराव आले आणि खोळंबलेले काम झाले
समाधीतुन बाहेर येउन तरार्लेला बेडूक बोले
पाऊसराव पाऊसराव किती बरा खाल्लात भाव 
तरी कसा आल्या आल्या हिरवा करून टकलात गाव

बिजलीच्या त्या तारा मधून तेवढ्यात आला अर्जंट फ़ोन
पाऊसराव जमीन बोलतेय "बायको" तुमची दुसरे कोण
कुठे होतात इतके दिवस, सांगा काही पटवा खूण
कुठल्या गावी कुठल्या देशी उधळत होता आपले गुण

पाऊसराव म्हंटले नाही चिंता जरी बायको रुसली
अहो मिठीत घेता मुठीत आली नाही ती बायको कसली..... !

- संदिप खरे
संदर्भ: Facebook share
लेखक : - संदिप खरे

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search