३/२९/२०१५

कसरत ...........


मनाने माझ्या तुला विसरण्याचे प्रयत्न खुप करावे 
अन लगेच तुझ्या आठवणीने का चोरपावलांनी खुणवावे ,
तुझ्या त्या शेवटच्या बोलण्याने वाटते जावे निघून खुप दूर 
अन थोडेसे जाता दूर पुन्हा लागते काळजाला तुझीच हुरहूर ,
रागात सहज वाटते कि जगेन एकटा कसाही 
अन जगताना खरे कळते कि उगाच राग झाला होता उत्साही ,
तू नाहीस माझ्याबरोबर तर आहे मी अपूर्ण 
अन हेही सांगते तुझे मन कि तुही नाहीस होणार पूर्ण ,
आता पाहिलं तू बोलणार सॉरी कि मी इथेच होऊन बसलेय गल्लत 
अन वाटतंय मला कि मीच बोलतो पहिल्यांदा सॉरी कशाला ही उगाचीच कसरत 
उगाचीच कसरत ............ 


संदर्भ: facebook share
लेखक :मयुर जाधव

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search